adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सातारच्या शिवथर मध्ये एटीएम फोडून 12 लाखांची रोकड लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीस अखेर ठोकल्या बेड्या, सातारा तालुका आणि स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी!

  सातारच्या शिवथर मध्ये एटीएम फोडून 12 लाखांची रोकड लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीस अखेर ठोकल्या बेड्या, सातारा तालुका आणि स्थानिक गुन्हे शाख...

 सातारच्या शिवथर मध्ये एटीएम फोडून 12 लाखांची रोकड लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीस अखेर ठोकल्या बेड्या, सातारा तालुका आणि स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी! 


संभाजी गिरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 सातारा तालुका पोलीस ठाणेच्या हद्दीमधील शिवथर या गावात शुक्रवारी मध्यरात्री  सातारा-लोणंद रस्त्यानजीक असलेले एसबीआय बँकेचे एटीएम अज्ञात तीन चोरट्यांनी फोडून सुमारे 12 लाख रुपयांवर डल्ला मारला होता. मात्र चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. काही जागरूक नागरिकांना चोरट्यांची चाहूल लागली होती. नागरिकांनी तातडीने धाव घेतली मात्र तोपर्यंत चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले, याच एटीएमची सात महिन्यांपूर्वी एटीएम फोडून सुमारे 13 लाख रुपये लांबवले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कुडकर सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे व एलसीबीचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली होती. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास सातारा तालुका पोलीस ठाणे आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी,कर्मचारी यांना सदर गुन्हा उघडकीस अन्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने सातारा तालुका पोलीस ठाणेकडील कर्मचारी, सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सदर आंतरराज्य टोळीस अखेर बेड्या ठोकल्या आहेत. हासमदित अल्लाबाद खान (वय 45 )रा. मल्हाररोड ता.फलोदी जि.जोतपूर) सलीम मुल्ली इस्ताक (वय 25) रा. दौरखी ता.फिरोजपूर जि.नहुमेवात) राहुल रफिक (वय 30) बाजीदपूर ता.फिरोजपूर जि.नहुमेवात) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता. या तिन्ही आरोपींनी सदर गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने त्यांच्या ताब्यातील एटीएम मधून चोरी केलेल्या 12,06,000/रुपये रकमेपैकी 11 लाख 99 हजार रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली क्रेटा कार तसेच एटीएम फोडण्यासाठी वापरलेले साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. सदर आरोपी हे हरियाणा राजस्थान येथील आहेत त्यांच्यावर यापूर्वी गुजरात आसाम राजस्थान कर्नाटक या राज्यांत याच प्रकारचे एटीएम चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्याचा अधिक तपास स.पो.नि. रमेश गर्जे करीत आहेत. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका प्रभारी अधिकारी निलेश तांबे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर स.पो.नि.रमेश गर्जे पो.उनि. विश्वास शिंगाडे पोलीस अंमलदार अतिश घाडगे संतोष सपकाळ विजय कांबळे अमित सपकाळ अमित माने ओंकार यादव स्वप्निल शिंदे रविराज वर्णेकर स्वप्निल कुंभार गणेश कापरे अविनाश चव्हाण मोहन पवार सचिन ससाने पृथ्वीराज जाधव प्रवीण पवार यांच्यासह सातारा तालुका पोलीस ठाणेकडील अधिकारी कर्मचारी,सातारा गुन्हे शाखेचे अधिकारी  कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. त्यांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

No comments