जळगाव जिल्हा हॉलीबॉल शिक्षक संघ राज्यस्तरावर विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज...
जळगाव जिल्हा हॉलीबॉल शिक्षक संघ राज्यस्तरावर
विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत धुळे येथे आयोजित विभागीय शिक्षक हॉलीबॉल स्पर्धेत जळगाव जिल्हा शिक्षक संघाने आपल्या उत्कृष्ट कौशल्याने व दमदार प्रदर्शनाने प्रथम नाशिक व अंतिम फेरीत नंदुरबार संघावर विजय प्राप्त करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघ विजयी ठरला. यासाठी जळगाव जिल्हा हॉलीबॉल संघाने संघातील महिला व पुरुष गटाची एकजूट दिसून आली. शिस्तबद्ध तयारी, खिलाडू वृत्ती व संघ भावना या तीन गोष्टींमुळे आम्ही विजय संपादन करू शकलो असे आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना आपल्या भावना खेळाडूंनी व्यक्त केल्या. यामध्ये जळगाव जिल्हा हॉलीबॉल शिक्षक संघ पुढीलप्रमाणे_ इक्तिखार मोहम्मद (जळगाव) क्षितिज सोनवणे (जळगाव) प्रशांत पाटील (चाळीसगाव) भूषण पवार (धरणगाव) मोहम्मद नूर (रावेर) शेख हुस्नुद्दीन (जामनेर) महेंद्र म्हैसरे (चोपडा) वृषाली पाटील (चोपडा) मोहिनी पाटील (अमळनेर) मंगल म्हेत्रे (जामनेर) डॉ. कांचन विसपुते (जळगाव) वंदना भालशंकर (मुक्ताईनगर) या शिक्षक खेळाडूंनी भाग घेतला. पंच म्हणून पायल मॅडम यांनी काम पाहिले. पुढील राज्यस्तरीय सामना कोल्हापूर येथे पार पडणार आहे. सर्व शिक्षक खेळाडूंचे अभिनंदन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, ना. गिरीश भाऊ महाजन, चोपड्याचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, जळगावचे आमदार राजू मामा भोळे, डायटचे प्राचार्य डॉ.अनिल झोपे, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) कल्पना चव्हाण चोपड्याचे गटशिक्षण अधिकारी अजित पाटील, प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. दीपक पाटील, विठ्ठल ओंकार पाटील यांनी केले आहे.

No comments