मानव सेवा प्राथमिक विद्यामंदिरात इयत्ता सहावीच्या वर्गात तीव्र वाचन प्रतियोगिता 2025 चे आयोजन नाविण्यपूर्ण उपक्रम -अभ्यास पुरक उपक्रम...
मानव सेवा प्राथमिक विद्यामंदिरात इयत्ता सहावीच्या वर्गात तीव्र वाचन प्रतियोगिता 2025 चे आयोजन
नाविण्यपूर्ण उपक्रम -अभ्यास पुरक उपक्रम उपक्रमशील शिक्षक ,कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांनी राबविले
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव - येथील मानव सेवा मंडळ ,जळगाव संचलित प्राथमिक विद्या मंदिरातील इयत्ता सहावीच्या वर्गात हिंदी विषयाचे तीव्र वाचनन प्रतियोगिता म्हणजे तेच तेज पठाण स्पर्धा घेण्यात आली . महत्त्वाचे म्हणजे शाळेमध्ये विद्याथ्यांची वाचनात आवड वाढावी, त्याच्या वेग, समज आणि शब्द संपदा विकसित व्हावी यासाठी उपक्रमशील शिक्षक , कलाशिक्षक सुनील दाभाडे यांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवला आहे.
या उपक्रमामुळे अकलन व वाचनात गती सुधारणा दिसून आले . यामुळे विद्यार्थ्यांची चांगली तयारी होईल इतर विषयांची प्रगती सुद्धा होईल. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आले. वाचनातील गतीमध्ये बदल होईल .तीव्र वाचन प्रतियोगिता या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची वाचनामध्ये गती वाढेल असे शाळेचा मुख्याध्यापिका माया अंबटकर यांनी सांगितले तसेच या उपक्रमाची कारवाही कौतुकास्पद आहे.
महत्त्वाचे मुद्दे
1) कमी वेळेत प्रभावीपणे वाचन करण्याच्या उत्तम मार्ग 2) यामुळे विद्यार्थ्यांमध्ये हिंदीचे पाठाची गती वाढेल.
3)विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमामुळे आत्माविश्वास वाढेल.
4) यामुळे पाठाचे वाचन संस्कृतीला नवीन दिशा मिळेल. या उपक्रमात तीव्र वाचन करणारे निशा पाटील प्रथम क्रमांक, डिंपल नन्नवरे द्वितीय क्रमांक देण्यात आले. या दोघं विद्यार्थ्यीना शालेय वस्तू मुख्याध्यापिका यांचा शुभहस्ते बक्षिस देण्यात आले. या नाविण्यपूर्ण उपक्रम राबविल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.एस.डाकलिया ,मानद सचिव विश्वनाथ जोशी व सर्व पदाधिकारी ,बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील ,माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुनिल दाभाडे यांचे कौतुक केले.

No comments