अंगावरील सोनं पाहून नियत बदलली, मित्रानेच काढला तृतीयपंथी मित्राचा काटा, घटनेनं सोलापूर हादरले, अवघ्या 6 तासांत आरोपींना ठोकल्या बेड्या ! ...
अंगावरील सोनं पाहून नियत बदलली, मित्रानेच काढला तृतीयपंथी मित्राचा काटा, घटनेनं सोलापूर हादरले, अवघ्या 6 तासांत आरोपींना ठोकल्या बेड्या !
(सोलापूर जिल्हा) संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सोलापूर शहरांतील लष्कर परिसरांत राहणाऱ्या एका तृतीयपंथीयाचा उशी तोंडावर दाबून खून केल्याची धक्कादायक घटना शनिवार (दि. 27) दुपारी तीनच्या सुमारांस उघडकीस आली. त्याच्याजवळील सोने, मोबाईल आणि दुचाकी चोरून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आहे. या घटनेमुळे सोलापूर शहर चांगलेच हादरले आहे, आयुब हुसेन सय्यद (वय 50 ) रा.पिंधारी मज्जित मुर्गीनाल लष्कर सोलापूर ) असे खून झालेल्या तृतीयपंथीचे नाव आहे. तृतीयपंथ आयुब सय्यद हे प्रभाग 16 मधून महापालिका निवडणुकीच्या रिंगणात होते. तो निवडणूक लढवणार असल्याची ही माहिती समोर होती. निवडणुकीची तयारी देखील केली होती. याबाबत त्यांनी व्हिडिओ आणि फोटो स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले होते. विशेष म्हणजे त्या इंस्टाग्राम वर लाखों फॉलोअर्स आहेत. शिवाय त्यांच्याकडे लाखों रुपयाचे सोनं असल्याची माहिती समोर होती. त्यांच्या खूनाच्या घटनेची नोंद ही सदर बाजार पोलिसांना झाली होती. मात्र या घटनेमुळे सोलापूरमधील राजकीय वातावरणात देखील मोठी खळबळ उडाली होती. लष्कर परिसरांत तणावपूर्ण शांतता आहे. सोलापूर शहर पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आव्हान देखील केले होते. या घटनेनंतर सोलापूर शहर पोलिसांनी संशयित आरोपींच्या घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. दरम्यान आयुब सय्यद यांची हत्या नेमकी कशामुळे करण्यात आली याचा तपास देखील सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने केला जात होता. त्या अनुषंगाने सोलापूर शहर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी सदर बाजार पोलीस ठाणेकडील आणि स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलिसांना तपासांच्या अनुषंगाने सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने सोलापूर शहर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी आणि सदरबाजार पोलिस ठाणेकडील कर्मचारी यांनी तपासाची चक्रे चांगलीच गतिमान करीत अखेर खूनाच्या गुन्ह्यातील आरोपींपर्यंत सोलापूर शहर पोलिसांची टीम पोहोचली, आरोपी नामे. यशराज उत्तम कांबळे (वय 21 ) आफताब इसाक शेख (वय 24) वैभव गुरुनाथ पनगुले (वय 24 )सर्व रा. लातूर जिल्हा) या तिघां आरोपींना सोलापूर शहर पोलिसांनी ताब्यात घेवुन अधिक विचारपूस केली असता. त्यांनी खूनाच्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. आरोपींना अवघ्या 6 सात तासांत सोलापूर शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

No comments