adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खूनाच्या गुन्ह्याचा छडा अखेर शिरवळ पोलिसांनी लावला,9 आरोपींना ठोकल्या बेड्या! अपघाताचा केला होता बनाव

  खूनाच्या गुन्ह्याचा छडा अखेर शिरवळ पोलिसांनी लावला,9 आरोपींना ठोकल्या बेड्या! अपघाताचा केला होता बनाव   (सातारा जिल्हा) संभाजी पुरीगोसावी ...

 खूनाच्या गुन्ह्याचा छडा अखेर शिरवळ पोलिसांनी लावला,9 आरोपींना ठोकल्या बेड्या! अपघाताचा केला होता बनाव 


 (सातारा जिल्हा) संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे आतिश अशोक राऊत (वय 32) रा. जुनीमाळ आळी  शिरवळ) याला मध्यरात्री पळशी सह विविध ठिकाणी नेत बेदम मारहाण करण्यात आली होती. यामध्ये त्याचा उपचारांदरम्यान पुण्यात मृत्यू झाला खूनाच्या घटनेने शिरवळकर नागरिक देखील संताप झाले होते. त्यांनी मृतदेह शिरवळ पोलीस ठाण्यात आणून ठेवला होता. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र शिरवळ पोलिसांनी यामध्ये तात्काळ तीन जणांना अटक केली होती. आतिश राऊतला तेजस भरगुडे व दीपक भरगुडे यांच्यासह काही युवकांनी बेदम मारहाण केली होती. यामध्ये गंभीर जखमी झाल्यानंतर अपघात दाखविण्याचा बनाव रचण्यात आला होता. गंभीर जखमी झाल्यानंतर आतिश राऊत याचा पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. अशोक राऊत त्यांच्या फिर्यादीनंतर खुनाचा गुन्हा शिरवळ पोलिसांनी दाखल करण्यात आला. त्या अनुषंगाने शिरवळ पोलिसांनी तपासाची चक्रे चांगलीच गतिमान करून दरम्यान गुन्ह्यातील आरोपींचा शोधार्थ स्थानिक गुन्हे अन्वेषण सातारा व शिरवळ पोलिसांचे तपास पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती. अधिक तपास स.पो.नि. कीर्ती महस्के करीत होत्या. या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी नामे. तेजस बाळासाहेब भरगुडे (वय 34 ) दीपक बाळासाहेब भरगुडे (वय 32) दोघे रा. पळशी ता. खंडाळा) आणि ऋषिकेश जगन्नाथ मळेकर (वय 28) रा. शिंदेवाडी ता. खंडाळा) यांना अटक करण्यात आली होती. तर इतर गुन्ह्यातील आरोपींचा शोधही अखेर शिरवळ पोलिसांनी अगदी शिताफीने लावला. यामध्ये आरोपी नामे. अविष्कार अनिल भरगुडे (वय 24) ऋषिकेश रामचंद्र भरगुडे (वय 27) नितीन पांडुरंग भरगुडे (वय 32) गणेश साधू भारगुडे (वय 26) सागर धनाजी भरगुडे (वय 36) तुषार दत्तात्रय भरगुडे (वय 35) सर्व रा. पळशी ता. खंडाळा) या सर्व आरोपींना आज रोजी अटक करण्यात आली आहे. सदर घडलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने नागरिकांना कोणाविषयी काही तक्रार, किंवा संशय असल्यास त्याबाबत आपण स्वतः कायदा हातात घेऊ नये, याबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी थेट शिरवळ पोलिसांशी संपर्क साधावा असेही आव्हान पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी शिरवळकरांना केले आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे स.पो.नि. सुशील भोसले स.पो.नि. कीर्ती महस्के पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार विलास यादव संजय सपकाळ नितीन नलावडे सचिन वीर सुनील मोरे तुषार कुंभार प्रशांत धुमाळ अजय झुंजार अजित बोराटे अक्षय नेवसे धीरज टिळेकर भाऊसाहेब दिघे अक्षय बगाड मंगेश मोझर दीपक पालेपवाड आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला. शिरवळ पोलिसांच्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे.

No comments