adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दिव्यांग समता सप्ताह : धरणगावात नाटिकेने पसरला भावनिक माहोल; 60 विद्यार्थ्यांची UDID नोंदणी

 दिव्यांग समता सप्ताह : धरणगावात नाटिकेने पसरला भावनिक माहोल; 60 विद्यार्थ्यांची UDID नोंदणी  विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड...

 दिव्यांग समता सप्ताह : धरणगावात नाटिकेने पसरला भावनिक माहोल; 60 विद्यार्थ्यांची UDID नोंदणी 


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव - दिव्यांग समता सप्ताहानिमित्त बालकवी ठोंबरे प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत आयोजित विशेष कार्यक्रमात “दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांची व्यथा” या नाटिकेने सर्वांचा हृदयस्पर्श केला. कार्यक्रमाला पालक, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, DIET प्राचार्य अनिल झोपे, जिल्हा शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

UDID कार्डसाठी 60 विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी

दिव्यांग विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी UDID कार्डसाठी ऑनलाईन नोंदणी शिबिर घेण्यात आले. शिबिरात 60 दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यात आली.

नाटिका ठरली भावनिक क्षणांचा केंद्रबिंदू

समावेशित शिक्षण तज्ञ  तुळशिराम सैंदाणे लिखित नाटिका “दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांची व्यथा” सादर झाली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गंगापुरीच्या मुख्याध्यापिका विद्या बोरोले यांच्या प्रभावी भूमिका सादरीकरणाने आणि इ.४ थीतील कु. दिप्ती सैंदाणे हिने साकारलेल्या कर्णबधिर मुलीच्या भूमिकेने उपस्थितांचे डोळे पाणावले.

स्वेटर वाटप आणि स्नेहभोजन

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करण्यात आले तसेच सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.

अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण यांनी गाण्याच्या माध्यमातून पालकांना समुपदेशन केले. गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांनी पालकांना “दिव्यांग मुलांमध्ये भेदभाव न करता प्रत्येकाला शिक्षणाची समान संधी द्या” असे आवाहन केले.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र सैंदाणे, केंद्रप्रमुख  भिकन शिरसाठ,  मनोहर नेरकर, प्रभात तडवी, दिनेश चौधरी, योगेश धनगर, RBSK वैद्यकीय अधिकारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक व विशेष शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक  तुळशिराम सैंदाणे, सूत्रसंचालन दीपक पाटील, तर आभार प्रदर्शन श् राजेंद्र सैंदाणे यांनी केले.

No comments