adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अहिल्यानगरचा राज्यात डंका..ध्वजदिन निधी संकलनात पुन्हा प्रथम

 अहिल्यानगरचा राज्यात डंका..ध्वजदिन निधी संकलनात पुन्हा प्रथम  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर :-सशस्त्र सेना ...

 अहिल्यानगरचा राज्यात डंका..ध्वजदिन निधी संकलनात पुन्हा प्रथम 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर :-सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात अहिल्यानगर जिल्ह्याने पुन्हा एकदा आपली श्रेष्ठ परंपरा कायम ठेवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.यंदा तब्बल 4 कोटी 75 लाख इतका विक्रमी निधी संकलित करून जिल्ह्याने सलग दुसऱ्या वर्षी अव्वल स्थान मिळवले.मुंबईतील राजभवन येथे आयोजित राज्यस्तरीय शुभारंभ व गौरव सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोरडे (नि.) उपस्थित होते.अहिल्यानगरची ही कामगिरी विविध शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था व नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे घडली आहे.जिल्हाधिकारी व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली खालील आस्थापनांनी उल्लेखनीय योगदान दिले :

श्री साईबाबा संस्थान, शिर्डी — ₹1 कोटी

महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV), राहुरी

अहिल्यानगर जिल्हा परिषद व शिक्षण विभाग

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST)

पोलीस विभाग

संकलित रक्कम खालील महत्त्वपूर्ण कल्याणकारी योजनांसाठी खर्च केली जाणार आहे :

देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना सहाय्य

दिव्यांग सैनिकांचे पुनर्वसन

आजी-माजी सैनिकांसाठीच्या कल्याण योजना

सैनिकांच्या परिवारांसाठी विविध मदत उपक्रम या निधीमुळे अनेक वीर कुटुंबांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल, असे स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोरडे यांनी सांगितले.

No comments