adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्री दत्त जयंती व जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मधु ताराचे महाआरोग्य मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पुण्यातील हडपसर येथे मोठ्या उत्साहात संपन्न.

 श्री दत्त जयंती व जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मधु ताराचे महाआरोग्य मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पुण्यातील हडपसर येथे मोठ्या उत्साहात स...

 श्री दत्त जयंती व जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मधु ताराचे महाआरोग्य मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पुण्यातील हडपसर येथे मोठ्या उत्साहात संपन्न. 


पल्लवी पाटील खामगाव 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

दिनांक.4 डिसेंबर 2025 रोजी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित भेडे टॉवर मित्र परिवार नियोजित पुण्यातील एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय आणि सूर्या सह्याद्री हॉस्पिटल यांच्या सहकार्याने पुणे शहरातील रिक्षा चालक आणि दिव्यांग यांच्या साठी भव्य मोफत नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच भव्य आरोग्य शिबिर मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडे यांच्या आणि भेडे टॉवर मित्र परिवार यांच्या नियोजनात आयोजित करण्यात आले. असंख्य रिक्षाचालक आणि दिव्यांगानी या शिबिराचा लाभ घेतला. 

आपणही समाजाचे देणे लागतो या उद्देशाने समाजासाठी थोर कार्य करणारे प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती हे शिबिराचे वैशिष्ट्य ठरले. 

या वेळी शिबिराचे उद्घाटन हडपसर येथील शंभू राजे अनाथालय संचालक मा.नगरसेवक आपला माणूस आदरणीय श्री मारुती आबा तुपे यांच्या हसते श्री गुदेव दत्त मूर्ती समोर दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

या शुभ प्रसंगी श्री स्वामी समर्थ आजी आजोबांच्या आपुलकीचे मायेचे घर आश्रमाचे संचालक सीमाताई काशीकर.धर्मादाय प्रॅक्टीशियन एड श्री रोहित सावंत.आझाद रिक्षा संघटना पुणे प्रमुख श्री शफीक भाई पटेल हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.

या वेळी विशेष उपस्थिती म्हणून रिक्षा चालकाना नेहमी मार्गदर्शक ठरणारे अप्पर पोलीस अधीक्षक C I D कोल्हापूरचे श्री विष्णू ताम्हाणे साहेब.हडपसर पोलिस स्टेशन गुन्हा अन्वेषण विभागाचे श्री पासलकर साहेब.आई बाबा मेडिकल फाउंडेशनच्या सौ.माधुरीताई पाठक श्री सुनील पाठक.वात्सल्य अनाथालय संचालक श्री मिलिंददादा सरवदे.हडपसर गोंधळे नगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते श्री प्रशांत सुर्से सौ पल्लवीताई सुर्से. तसेच सर्वच क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते. या वेळी सर्वच मान्यवरांनी मधु ताराच्या लोकोपयोगी कार्याची प्रशंसा करत आपले मनोगत व्यक्त केले.

No comments