adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

८१ वर्षांच्या वृद्धेला लुटणारे जेरबंद..!सोनारासह चोरट्यांचे बारामती कनेक्शन..स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

 ८१ वर्षांच्या वृद्धेला लुटणारे जेरबंद..!सोनारासह चोरट्यांचे बारामती कनेक्शन..स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई  सचिन मोकळं अहिल्यानगर (...

 ८१ वर्षांच्या वृद्धेला लुटणारे जेरबंद..!सोनारासह चोरट्यांचे बारामती कनेक्शन..स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.५):जीसाळीवाडा परिसरात ८१ वर्षीय गिताबाई ठाणेकर यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळणारी चोरट्यांची टोळी अखेर स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरच्या धडाकेबाज कारवाईत अटकेत आली आहे. त्याच बरोबर चोरीचे दागिने खरेदी करणारा सोनारही पोलिसांच्या जाळ्यात अडकला.पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली उघडकीस आलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांना मोठा धक्का बसला आहे.दि.21 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता,फिर्यादी गिताबाई ठाणेकर (वय 81,रा. साळीवाडा,संगमनेर) या गीता प्रोव्हिजन स्टोअरच्या समोर उभ्या असताना,दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पोबारा केला.

या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गु.र. नं. 1040/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 कलम 309(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधीक्षकांनी विशेष निर्देश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी विशेष पथक तयार केले.या पथकात पोउपनि.समीर अभंग,पोलीस अंमलदार संतोष खैरे,लक्ष्मण खोकले,गणेश लोंढे, फुरकान शेख,भिमराज खर्से, राहुल डोके,अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ,योगेश कर्डीले,प्रशांत राठोड तसेच चालक अरुण मोरे यांचा समावेश होता.पथकाने घटनास्थळावरील तपास, गोपनीय माहिती,तांत्रिक विश्लेषण आणि व्यवसायीक कौशल्य यांच्या आधारे आरोपींचा माग काढला.तपासादरम्यान कळाले की चोरी अनिल बिरदवडे या सराईत गुन्हेगाराने साथीदार अशोक गंगावणे यांच्या मदतीने केली आहे.वरिष्ठांची परवानगी घेऊन पथकाने बारामतीत सापळा रचून अनिल रघुनाथ बिरदवडे (वय 37) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार

अशोक विश्वनाथ गंगावणे (फरार) यांच्या मदतीने ही घटना केल्याची कबुली दिली.चोरीचा सोनेरी मुद्देमाल त्यांनी बारामतीतील सोनार भावंडांना

ऋषिकेश योगेश ढाळे (वय 22) व यश योगेश ढाळे (फरार) — दिल्याचे उघड झाले.ऋषिकेश ढाळे यासही पथकाने ताब्यात घेतले असून त्याने दागिने आपल्या भावाकडे ठेवून दिल्याचे सांगितले.अटक आरोपींना संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  पार पाडली.

No comments