चोपडा येथे भारतीय बौद्ध महासभेने महामानवास अभिवादन. चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा येथे दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इ...
चोपडा येथे भारतीय बौद्ध महासभेने महामानवास अभिवादन.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा येथे दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चोपडा शहर व तालुका शाखेच्या वतीने 69 वा महामानवाचा महापरिनिर्वाण दिवस साजरा करून अभिवादन करण्यात आले.यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळास बापूराव गिरधर वाणे व भरत भिमराव शिरसाठ याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्रिशरण, पंचशील,बुद्धपुजा,भिमस्मरण, भिम स्मुर्ती घेण्यात आले.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर बापूराव वाणे यांनी मार्गदर्शन केले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा व पंचशील नगर मित्र मंडळ यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी शिरपूर येथील स्व.मुकेशभाई पटेल रक्तपेढी यांनी शंभर बॅग रक्त संकलन केले. भारतीय बौद्ध महासभेचे वतीने रक्तदात्याना 20 लिटरचा पाण्याचा जार व प्रमाणपत्र देण्यात आले.सदर कार्यक्रमास तालुकाध्यक्ष बापूराव वाणे,भरत शिरसाठ शहर अध्यक्ष, एस.व्ही. करंदीकर, संतोष अहिरे, जानकीराम सपकाळे, सुदाम ईशी, प्रविण करंकाळ, समाधान सोनवणे, वसंत शिंदे, विजय शंभरकर, पुंडलिक भालेराव, सुनिता सपकाळे,डॉ. बनकर, अरविंद वाडे, मनोहर शिरसाठ, सुकदेव बाविस्कर, सुनिल शिरसाठ, अशोक शिरसाठ, महेंद्र सोनवणे, विजय काढरे, छोटू वारडे, रुपेश भालेराव, सुनिल भालेराव, इत्यादी बौद्ध उपासक, उपासिका मोठया संख्येने उपस्थित होते.


No comments