कै. सुरेखा गंगाराम पेढांबकर - कृतार्थ जीवन आदर्शवत कुटुंबाची निर्मिती करून एक आदर्श माता म्हणून गौरविल्या जाणारी परो...
कै. सुरेखा गंगाराम पेढांबकर -
कृतार्थ जीवन
आदर्शवत कुटुंबाची निर्मिती करून एक आदर्श माता म्हणून गौरविल्या जाणारी परोपकारी व सेवाभावी वृत्तीच्या प्रेमळ मनाच्या कै. सुरेखा गंगाराम पेढांबकर यांचे दिनांक २०.१२.२०२५ रोजी अकाली दुःखद निधन झाले. त्यानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयीची माहिती देऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो.
कै.सुरेखा गंगाराम पेढांबकर यांचे लग्न घरंदाज घराण्यातील श्री.भागोजी हरी पेढांबकर यांचा मुलगा श्री.गंगाराम भागोजी पेढांबकर यांच्याशी झाला. अतिशय सुखाचा संसार त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत असताना संसाराचा गाढा सांभाळला.
कर्तबगार पुरुषांना कर्तबगार पत्नी लाभली. तर तो शर्करा योगच म्हणावा लागेल. सरस्वती सुसविरकर यांची गुणी व सुसंस्कृत मुलगी पूर्वाश्रमीची सौ. शालिनी सुसविरकर घराण्याचा लौकिक व मुलीचे वर्तन या गोष्टी विचारात घेऊन दिली. दि. १२ डिसेंबर १९६४ रोजी विवाह सोहळा पार पाडला. श्री.जी.बी.पेढांबकर यांना सुरेखा म्हणून अनुरुप पत्नी लाभली. माहेरी सुखात वाढलेली परंतु सासरी गरिबी आणि छोटेसे गवतारु घर पाहून बावरून न जाता अत्यंत खंबीरपणे पतीच्या संसाराला साथ दिली. मातेपेक्षाही प्रेम देणारी सासू जिजाबाई हिच्या पंखाखाली तीने कंबर कसली. वेळप्रसंगी मोलमजूरी केली. आणि संसाराला हातभार लावण्यात आनंद मानला. संसाराचा गाडा अत्यंत गरीबीत चालला असला तरी सुरेखाबाईनी कोणत्याही गोष्टीबद्दल तक्रार न करता सारा घर संसार चालविला. आणि कौटुंबिक वातावरण नेहमी आनंदी व प्रसन्न राखण्याचा प्रयत्न केला पतीविषयी मोठा अभिमान बाळगून परस्परांवरील आदरयुक्त प्रेमभाव जपला.
पतीच्या ध्येयवादी जीवनाशी समरस होवून सुखासमाधानाने जीवन जगत पतीच्या नावलौकीकास जपत त्या संसारात उत्तम साथ करीत होत्या. त्यांचा टापटिप पद्धतीने नेटका संसार करण्याचा गुण वाखाणण्याजोगा होता. पती उत्तम उच्चअधिकारी पदावरून निवृत्त तसेच समाजसेवा करीत असताना दुरदर्शी सुरेखाबाईनी कुटुंबाची सर्व जबाबदारी पार पाडली. मुलांवर आदर्श संस्कार करून चांगले वळण त्यांनी लावले. उत्तम शिक्षण देत तीनही मुलांना उत्तम संस्कार देत घडविले. सर्व मुलांना जीवनाची योग्य दिशा दाखवून प्रेमाचा व सदाचाराचा वारसा दिला. मुलांचे जीवन विशाल बनविण्याची संजीवनी त्यांच्या कर्तव्य पालनात आहे हे दिसून येते. एक आदर्श पत्नी, आदर्श माता व आदर्श गृहिणी म्हणून त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. आज या उभयतांना दोन सुसंस्कृत मुलगे व एक मुलगी अशी तीन अपत्ये असून अत्यंत विनयशील व नम्र आहेत.
तीनही मुलांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त केलेली असुन विशेष गुणवत्ता धारक आहेत. थोरला मुलगा राजेश हा अमेरिका येथे उच्च पदावर नोकरी करीत आज ठाणे येथे कार्यरत आहे. धाकटा मुलगा उमेश ऑस्ट्रेलियात स्थायिक असून एक उच्च पदावर अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तसेच इलेक्ट्रिक एक्झीक्युटीव्ह इंजिनीअर आहे. राजेश याची पत्नी सौ. सोनाली व सौ.शीतल ह्या दोन्हीही आदर्श सुना त्यांना कुटुंबात लागल्या.
तीसरी मुलगी डॉ. शर्मिला ही एम. डी. असून के.ई. एम हॉस्पिटल मुंबई येथे मेडीकल ऑफीसर म्हणून कार्यरत आहे. मुलगी शर्मिला तिचे पती श्री. विनायक जालगावकर पेशाने डॉक्टर असून उच्च वैद्यकीय अधिकारी पदावर कार्य करीत आहे.. अशा प्रकारे आदर्श कुटूंब या दाम्पत्याने घडविले. याचे सारे श्रेय धर्मपत्नी सौभाग्यवती सौ. शालिनी गंगाराम पेढांबकर यांना जाते. सुरेखा पेढांबकर दाम्पत्याचा संसार म्हणजे प्रेम आणि श्रमरुपी सरितांचा संगमच होय.
जन्मानंतर मृत्यू सर्वानाच असतो पण आनंद जीवन जगण्याची गुरुकुल्ली देऊन सर्वांना मायेचा ओलावा प्रेम जिव्हाळा आपुलकी देणारी जगाची माय आज अखेर कैलासवासी सुरेखा गंगाराम पेढांबकर आपल्यातून निघून गेल्या.
"देह त्यागिता कीर्ती मागे उरावी" या रामदासांच्या वचनाप्रमाणे त्यांच्या गुणांचा सुगंध दरवळत राहील.
मोठी काकूच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी भावपूर्ण श्रद्धांजली!!!
श्री.योगेश तानू पेढांबकर
पेढांबे - भराडे
मोबा.९७६३९५७६०५

No comments