सिकलसेल सप्ताह निमित्त जिल्ह्याला रक्तदान शिबिराचे आयोजन. जळगांव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग...
सिकलसेल सप्ताह निमित्त जिल्ह्याला रक्तदान शिबिराचे आयोजन.
जळगांव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत 11 डिसेंबर पासून सिकलसेल सप्ताह साजरा केला जात असून, त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल व जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.जळगाव येथे आज रक्तदान शिबिर पार पडले.
शिबिरामध्ये तालुका सर्व आरोग्य अधिकारी, सर्व आरोग्य सेवा कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी, व इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.
याबाबत अधिक माहिती देतांना डॉ.सचिन भायेकर यांनी सांगितले की सिकलसेल,थॅलेमेमीया तशा रक्ताची निगडित आजाराने बाधित असलेल्या रुग्णांना नियमित रक्ताची गरज भासत असते, अशा सर्व गरजू रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये, म्हणून हे रक्तदान शिबिर आयोजित केलेले असून, रक्तदान हे सर्वात मोठे श्रेष्ठदान असल्याने, वर्षातून किमान दोन वेळा तरी प्रत्येक नागरिकांने... रक्तदान हे करावे असे आवाहन सदर प्रसंगी डॉ.भायेकर यांनी केले व स्वतः डॉ. भायेकर यांनी देखील रक्तदान करून सहभाग नोंदवला.
सदर शिबिराच्या प्रसंगी जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रमेश धापते, डॉ. प्रमोद पांढरे, डॉ.बाळासाहेब वाबळे, डॉ.सुपे आदी सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी तथा इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील रक्तदान केले. सदर रक्तदान शिबिर यशस्वी होण्याकरिता विशेषतः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांची रक्तपेढीची सर्व टीम, आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच जळगाव जिल्हा सिकलसेल समन्वयक टीम यांनी विशेष परिश्रम घेतले. आज पार पडलेल्या रक्तदान शिबिराप्रसंगी 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

No comments