“रमाईचा धनी” – सिंगर राहुल धुंदले यांनी बाबासाहेब आणि रमाईंना समर्पित केलेलं हृदय पिळवटून टाकणारं गीत रावेर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकां...
“रमाईचा धनी” – सिंगर राहुल धुंदले यांनी बाबासाहेब आणि रमाईंना समर्पित केलेलं हृदय पिळवटून टाकणारं गीत
रावेर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर आणि माता रमाई यांच्या संघर्षमय व प्रेरणादायी जीवनावर आधारित “रमाईचा धनी” हे गीत नुकतंच रिलीज झालं असून समाजात प्रचंड गाजत आहे.या गाण्याला आपल्या आत्मीय आणि भावनिक आवाजातून सजीव केलं आहे तरुण व लोकप्रिय गायक राहुल धुंदले यांनी. त्यांच्या गायकीतून बाबासाहेबांवरील गाढ आदर, रमाईंच्या त्यागाची वेदना आणि त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय नात्याची झलक अत्यंत प्रभावीपणे प्रकट होते.
गीतामध्ये रमाईंच्या निःस्वार्थ त्यागाचा, बाबासाहेबांच्या महान कार्यामागील त्यांच्या निःशब्द योगदानाचा आणि त्यांच्या प्रेमाच्या शुद्ध भावनेचा सुंदर संगम दिसतो.
हे गीत केवळ संगीत नाही, तर रमाईंच्या संघर्षाची गाथा आणि बाबासाहेबांच्या विचारांची शक्ती आहे.सोशल मीडियावर हे गाणं वणव्यासारखं पसरत असून हजारो समाजबंधू आणि तरुण वर्ग या गीतातून प्रेरणा घेत आहेत.“रमाईचा धनी” हे गीत प्रत्येक आंबेडकरी मनाला स्पर्शून जात आहे आणि रमाई–बाबासाहेबांच्या अमर प्रेमकथेचा गौरव पुन्हा एकदा जिवंत करत आहे. समाजातील तरुणाईकडून एकच प्रतिसाद.असं गीत रोज ऐकायला मिळालं पाहिजे... जय भीम!”

No comments