संजीवकुमार झाडे सांगली स्थानिक गुन्हे शाखेचे नवे पोलीस निरीक्षक, तर पोलीस निरीक्षक सतीश शिंदेंनी याच पदावर आपला कार्यकाळ गाजवला ! (सांगली...
संजीवकुमार झाडे सांगली स्थानिक गुन्हे शाखेचे नवे पोलीस निरीक्षक, तर पोलीस निरीक्षक सतीश शिंदेंनी याच पदावर आपला कार्यकाळ गाजवला !
(सांगली जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सांगली जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांची बदली झाली असून. त्यांच्या रिक्त जागेवर नव्याने संजीव कुमार झाडे आता स्थानिक गुन्हे शाखेचे नवे पोलीस निरीक्षक म्हणून असणार आहेत. सांगली स्थानिक अन्वेषण गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदेंनी आपल्या कार्यकाळात दमदार कार्यकाळ याच पदावर गाजवला होता. सलग तीन वर्ष याच पदावर त्यांनी उत्कृंष्ट सेवा देवुन विविध गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांना यश आले मिळाले आहे. जवळपास 1 हजार 480 गुन्ह्यांचा छडा लावण्यात सतीश शिंदे यांना आपल्या सहकाऱ्यांसमवेत काम करताना यश मिळाले आहे. त्यांच्या या कामगिरीने त्यांना विविध पोलीस महासंचालक अशा विविध पथकांने देखील गौरविण्यात आले होते. आता नव्याने आलेले पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे हे एक सांगलीतील कर्तव्यदक्ष आणि अनुभवी अधिकारी असून त्यांनी यापूर्वी तासगांव मिरज शहर अशा विविध ठिकाणी काम केले आहे. आणि त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांनाही विशेष पोलीस महासंचालक पदकही मिळाले आहे. मात्र याच पदावर कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सलग तीन वर्ष सेवा देवुन उत्कृष्ट सेवा दिल्याने सांगली जिल्ह्यातील जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच पत्रकार बांधव व त्यांच्या सर्व सहकारी बांधवांतून पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांचे विशेष कौतुक होत आहे.

No comments