adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचा सोळावा वर्धापन दिन उत्साहात

 शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचा सोळावा वर्धापन दिन उत्साहात  इदू पिंजारी फैजपूर -  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताई...

 शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचा सोळावा वर्धापन दिन उत्साहात 


इदू पिंजारी फैजपूर - 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगावचा १६  वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी राज्यातील आदर्श प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, पत्रकार, समाजसेवक, क्रीडा कला  क्षेत्रातील ७५  मान्यवरांना तापी पूर्णा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याचे अध्यक्ष  एरंडोल येथील सुप्रसिद्ध कवी  प्रा.वा.ना.आंधळे होते तर उद्घाटक खामगाव येथील  पांडुरंग दैवज्ञ यांच्या शुभहस्ते करण्यात झाले. याप्रसंगी आदिशक्ती संत मुक्ताई ,देवी सरस्वती, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या शुभहस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर शाहीर मनोहर पवार यांनी राज्य गीत सादर करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. प्रसंगी मान्यवरांचा शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी उज्जैनकर  फाउंडेशनचे गौरव गीत फाउंडेशनचे  कवी अशोक मोहिते यांनी व्हिडिओ क्लिप द्वारे सादर केले. तसेच शाहीर मनोहर पवार  त्यांनी फाउंडेशनचा कार्य गौरव पोवाडा गाऊन उपस्थितांची दाद मिळवली .या प्रसंगी मान्यवरांनी उज्जैनकर फाउंडेशनचे कौतुक केले. प्रसंगी महाराष्ट्राचे माजी महसुल मंत्री  लोकनेते एकनाथराव खडसे यांनी भ्रमण ध्वनीद्वारे उपस्थित पुरस्कारार्थी विद्यार्थी आणि फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांचे अभिनंदन केले

        भोजना नंतरच्या दुपारच्या सत्रामध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील इयत्ता दहावी आणि बारावीतील ७५  गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह, गुलाब पुष्प व स्वामी विवेकानंदांचे पुस्तक व फोटो भेट देऊन सत्कार सोहळा जळगाव जिल्ह्याचे शिक्षक नेते एस.डी. भिरुड  यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला.याप्रसंगी सुप्रसिद्ध कवी डी.बी. जगतपुरिया, शिक्षण महर्षी एस.ए.भोई, मुक्ताईनगर येथील प्रभाग १२ च्या नवनियुक्त नगरसेविका सौ. माधुरीताई  सचिन पाटील, मलकापूर येथील समाजसेवक मनोहर गलवाडे, खामगावचे विनोद डिडवाणीया, प्रा.डॉ. दीपक  शाहीर, मनोहर पवार ,शंकरराव अनासुने, बाळुभाऊ इटणारे, उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक शिरसाट,राज्य सचिव अँड सर्जेराव साळवे, विदर्भ विभागीय अध्यक्ष प्राचार्य पंढरीनाथ शेळके, फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर, कार्यकारणी खजिनदार सौ.संगीता उज्जैनकर, सचिव प्रमोद पिवटे,सदस्य प्रा. विनायक वाडेकर, संतोष ठाकूर ,सुनील मुंधोकार,दीपक बुडूखले, सौ.दिपाली बुडूखले, अरविंद उज्जैनकर आणि महाराष्ट्रातील फाऊंडेशनचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments