भाजपा फैजपूर गट नेतापदी सिद्धेश्वर वाघूळदे,उप गटनेता पदी सूरज गाजरे इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ऐतिहासिक फैजपूर नग...
भाजपा फैजपूर गट नेतापदी सिद्धेश्वर वाघूळदे,उप गटनेता पदी सूरज गाजरे
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ऐतिहासिक फैजपूर नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा पदी दामिनी सराफ सह भाजपा चे ९ नगरसेवक तसेच त्यांना पाठींबा देणारे ३अपक्ष नगरसेवक मिळून झालेल्या सत्ताधारी गटाचे नेते पदी प्रभाग क्र १० अ मधून बिनविरोध झालेले भाजपा प्रज्ञावंत आघाडी चे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक सिद्धेश्वर लीलाधर वाघूळदे तर उप नेते पदी प्रभाग क्र ९ अ चे सूरज रमेश गाजरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे
नगरपरिषदेत बऱ्याच कालावधी नंतर नवख्या तरुण पिढीला गट नेते पदी आरूढ केल्याने आ.अमोल जावळे यांच्या 'नव्या दिशा नव्या आशा ' ह्या भाजपा संकल्पना ने तरुणाईला सशक्तीकरणाला नवे बळ मिळाले आहे शहरातील व भाजपा शिवसेना युती चे तरुण कार्यकर्ते मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रसंगी भाजपा राज्य परिषद सदस्य हिरालाल चौधरी, नगराध्यक्षा दामिनी सराफ, नगरसेवक सागर होले, महेंद्र मंडवाले, नगरसेविका नीलिमा महाजन, निकिता कोळी, दिपाली भारंबे, जयश्री चौधरी, सुनीता नेहेते, अमिता चौधरी, भावना भारंबे, विनोद चौधरी तसेच पवन सराफ ,प्रकाश कोळी, अनंता नेहेते, हेमराज चौधरी, राजेश महाजन, नरेंद्र चौधरी, संदीप भारंबे, फैजपूर मंडळ अध्यक्ष उमेश बेंडाळे, फैजपूर मंडळ सरचिटणीस पिंटू तेली, कार्यकर्ते भूषण गलवाडे आदी उपस्थित होते

No comments