सिकलसेल सप्ताहानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात जनजागृती कार्यक्रम संपन्न विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धरणगाव- “सिकलसे...
सिकलसेल सप्ताहानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात जनजागृती कार्यक्रम संपन्न
विकास पाटील धरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव- “सिकलसेल सप्ताह” या उपक्रमांतर्गत आदर्श माध्यमिक विद्यालय, धरणगाव येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सिकलसेल आजाराबाबत जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सिकलसेल आजाराची कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, उपचार पद्धती तसेच दैनंदिन जीवनात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, धरणगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या शंकांचे समाधान केले. यावेळी डी. जी. शिंपी,परिचारिका भदाने (ANM), परिचारिका मोरावकर (ANM), महेंद्र माळी (MPW), मयूर पाटील (MPW) यांची उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. सिकलसेल आजाराविषयी योग्य माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती वाढल्याचे दिसून आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे सर्व शिक्षकवृंदांचे सहकार्य लाभले


No comments