साकळीच्या शारदा विद्या मंदिर शाळेत ' नारी शक्ती ' स्नेहसंमेलन रंगले ! अनेक विद्यार्थ्यांनी सादर केले कलागुण असंख्य पालकांचा विद्या...
साकळीच्या शारदा विद्या मंदिर शाळेत ' नारी शक्ती ' स्नेहसंमेलन रंगले !अनेक विद्यार्थ्यांनी सादर केले कलागुण
असंख्य पालकांचा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
मनवेल ता.यावल :- साकळी येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ' नारीशक्ती ' स्नेहसंमेलन २०२५-२६ कार्यक्रम दि. ११ रोजी शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात रंगला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी सरोज पाटील मॅडम होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाच्या अध्यक्षा श्रीमती विद्याताई वसंतराव महाजन, उपाध्यक्ष सुभाष भास्कर महाजन, कार्याध्यक्ष प्रमोद सोनवणे, सर्व संचालक मंडळ, यावल तालुका तहसिलदार मोहनमाला नाझीर कर, यावलचे आगार प्रमुख श्री. डी. बी. महाजन साहेब व त्यांचे सहकारी, प्रगतिशील शेतकरी जितेंद्र महाजन, गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व मधुकर शिंपी, माजी उपसरपंच किरण महाजन, भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा संयोजक डॉ.सुनिल पाटील, यावल तालुका खरेदी विक्री संघाचे माजी उपसभापती तथा संचालक तेजस पाटील, साकळीचे केंद्रप्रमुख किशोर चौधरी, पोलीस हेड़ कॉन्स्टेबल अर्जुन सोनवणे, रोहील गणेश, शिरसाडचे मुरलीधर आप्पा पाटील, वढोद्याचे सरपंच संदीप सोनवणे, माजी सरपंच समाधान पाटील (नावरे), सामाजिक कार्यकर्ते विलास पवार,थोरगव्हणचे माजी उपसरपंच समाधान सोनवणे, माजी ग्रा.पं.हरीभाऊ पाटील (पथराळे) यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशभरातील मृतात्म्यांना व शहीद झालेल्या जवानांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा तथा माजी जि.प.सदस्या श्रीमती विद्याताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव तुषार वसंतराव महाजन यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी दर शनिवार हा ' आनंदाचा वार ' साजरा करण्याचे परिपत्रक राज्य शासनाच्या वतीने नुकतेच काढण्यात आले.याबाबत या निर्णयाचे संस्थेच्या वतीने जितेंद्र महाजन यांनी स्वागत केले. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. गणेश वंदना या सामूहिक नृत्याने स्नेहसंमेलनाची सुरुवात करण्यात आली. परिनृत्य, नारीसन्मान, शेतकरी नृत्य, सोलो ॲक्ट, कोळी नृत्य, सामूहिक नृत्य, देशभक्तीपर नृत्य, गायन, विडंबन व समाजप्रबोधन नाटिका असे विविध बाहरदार कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले.या सर्व विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित रसिकांनी उत्तम असा प्रतिसाद दिला.काही कार्यक्रम उपस्थितांना भावनिक करून गेले.इ. ५ वी च्या ग्रुपने सादर केलेला नारी सन्मान या नाटिकेचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती विद्याताई महाजन यांनी व्यासपीठावर जाऊन कौतुक केले. हे विशेष होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य आर.जे.महाजन यांनी केले.सुत्रसंचालन सौ.के.पी.गोरे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन एस.पी.निळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य आर.जे.महाजन सर, पर्यवेक्षक एस.जे.पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहसंमेलन प्रमुख एस.पी.निळे सर, सर्व शिक्षक, शिक्षिका,ज्ञशिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments