कॉलेज रोडवर भरदिवसा बंटी जहागीरदारवर गोळीबार उपचारापूर्वीच मयत..शहरात तणावाचं वातावरण सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...
कॉलेज रोडवर भरदिवसा बंटी जहागीरदारवर गोळीबार उपचारापूर्वीच मयत..शहरात तणावाचं वातावरण
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.३१):-श्रीरामपूर शहरात भरदिवसा घडलेल्या थरारक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.कॉलेज रोड परिसरातील कबरीस्तान येथून एका अंत्यविधीवरून परतत असताना जर्मन हॉस्पिटल परिसरात मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली ही घटना आज ३१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे अडीचच्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.या घटनेनंतर बंटी जहागीरदार यांच्या समर्थकांनी श्रीरामपूर शहरातील कामगार हॉस्पिटलसमोर मोठी गर्दी केली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु बंटी जहागीरदार यांच्यावर उपचार करण्याआधीच त्यांची प्राणज्योत नगर शहरातील साईदीप हॉस्पिटल येथे मावळली.
गोळीबार करणारे मोटारसायकलवरून आलेले आरोपी नेमके कोण होते? त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून हा हल्ला केला? हल्ल्यामागील कारण काय? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून,पोलीस सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत.शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान,या थरारक घटनेमुळे श्रीरामपूर शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, पुढील तपासात नेमकं काय उघड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments