adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रहार दिनदर्शिका चा दिमाखदार प्रकाशन सोहळा माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते प्रकाशन

 प्रहार दिनदर्शिका चा दिमाखदार प्रकाशन सोहळा माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते प्रकाशन  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:-हेमकां...

 प्रहार दिनदर्शिका चा दिमाखदार प्रकाशन सोहळा माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते प्रकाशन 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘प्रहार दिनदर्शिका या वार्षिक दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कालनिर्णयाचे प्रकाशन माजी राज्यमंत्री दिव्यांग हृदय सम्राट व प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष मा.आमदार बच्चू कडू यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा महासचिव राजेश पाटील खारोडे, दीपक भाऊ भोगाळे, आझाद फाउंडेशनचे संस्थापक गोपाल पोहरे, विजय माळी, बाळकृष्ण नेमाडे, अशोकराव नेमाडे, रायखेड येथील सरपंच  प्रहार अपंग संघटना ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदीप ताथोड दिनेश जंजाळ तसेच श्रीराम खारोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रहार कालनिर्णयमध्ये धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच जनजागृतीपर उपयुक्त माहितीचा समावेश करण्यात आला आहे. प्रकाशनप्रसंगी बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले, “प्रहार ही केवळ राजकीय चळवळ नसून शेतकरी, कामगार, युवक व वंचितांच्या हक्कांसाठी सातत्याने लढणारी जनआंदोलनाची चळवळ आहे. कालनिर्णयाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचा संदेश घराघरात पोहोचेल.” कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली.

No comments