" सरदार वल्लभ भाई पटेल इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनाचा ...
" सरदार वल्लभ भाई पटेल इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम संपन्न
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
आज दि . ६ डिसेंबर २०२५ रोजी सरदार वल्लभ भाई इंग्लिश मीडियम स्कूल इंग्लिश मीडियम स्कूल यावल मध्ये शाळेचे अध्यक्ष डॉ . प्रदीप माहेश्वरी सर यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . शीला मॅडम यांच्या उपस्थितीत महामानव भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले .
प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .शीला तायडे मॅडम यांच्या हस्ते डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. इयत्ता पहिलीचा विद्यार्थी उत्कर्ष भालेराव याने डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील घडलेली गोष्ट विद्यार्थ्यांना सांगितली व शीला तायडे मॅडम यांनी गीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त अशी प्रेरणा दिली. कार्यक्रमाप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments