लासुर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने फळ वाटप. विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा तालुक्यातील लासुर येथ...
लासुर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने फळ वाटप.
विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील लासुर येथील पंचशील नगर मध्ये सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने प्रतिमेचे पूजन करण्यात आले . यावेळी सामूहिक त्रिशरण ,पंचशील व भीमस्मृती म्हटली गेली,डॉ बाबा साहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.या निमित्ताने लासूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम प्रा .ए के गंभीर यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष चोपडा सूतगिरणीचे संचालक अमृतराव वाघ हे होते. यावेळी एच वाय वारडे यांनी स्वातंत्र्य, बंधुता व सामाजिक ऐक्य या बाबासाहेबांच्या विचारावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन अहिरे, डॉ. तांबे मॅडम, कैलास बाविस्कर, मुस्ताक पठाण, अनिल वाघ, प्रेमानंद वारडे, गोपीचंद सपकाळे, अशोक संदानशिव, अविनाश ढिवरे ,राहुल बाविस्कर, समाधान म्हैसरे, वीकी निकम, समाधान सपकाळे, बाळु सोनवणे, अशोक कोळी,रविंद्र म्हैसरे, पत्रकार विश्राम तेले,आत्माराम पाटील, अजय पालीवाल, ह भ प बापू महाराज, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आशा वर्कर भगिनी तसेच समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वारडे सर यांनी केले. तर आभार देवीलाल बाविस्कर यांनी मानले.

No comments