adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दरोड्याचा डाव टाकण्याच्या तयारीत असलेले ४ सराईत आरोपी अटकेत शस्त्रसाठा व दुचाकी जप्त स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

  दरोड्याचा डाव टाकण्याच्या तयारीत असलेले ४ सराईत आरोपी अटकेत शस्त्रसाठा व दुचाकी जप्त स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई   सचिन मोकळं अह...

 दरोड्याचा डाव टाकण्याच्या तयारीत असलेले ४ सराईत आरोपी अटकेत शस्त्रसाठा व दुचाकी जप्त स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.२२):-पारनेर तालुक्यातील हंगा परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने जेरबंद करत मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत आरोपींकडून एकूण ५०,९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री पोलीस निरीक्षक श्री.किरणकुमार कबाडी यांना खात्रीशीर बातमी मिळाली की,पाच इसम विनानंबरच्या दोन मोटारसायकलवर सुपा ते पारनेर रस्त्याने दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जाणार आहेत.ही माहिती त्यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक संमीर अभंग,पोलीस अंमलदार अतुल लोटके,दीपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे,आकाश काळे,सागर ससाणे,बाळासाहेब खेडकर यांना देत तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

पथकाने सुपा ते पारनेर रस्त्यावर सापळा रचला.काही वेळातच समोरून दोन मोटारसायकल येताना दिसून आल्या.पोलिसांनी त्यांना थांबवून ओळख सांगण्याचा प्रयत्न करताच,एका मोटारसायकलवरील इसम पळून गेला.पोलिसांनी त्याचा पाठलाग केला मात्र तो फरार होण्यात यशस्वी ठरला.पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चार इसमांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

सगड्या उंब-या काळे (वय ५०), रा. सुरेगाव,ता.श्रीगोंदा,जि. अहिल्यानगर)

मिथुन उंब-या काळे (वय २६), रा. सदर

सार्थक सगड्या काळे (वय २३), रा. सदर

गणमाळ्या संजय चव्हाण (वय २३), रा. दिवटे मळा, वाघुंगे, ता. पारनेर, जि.अहिल्यानगर

तपासादरम्यान मिथुन काळे याने फरार आरोपीचे नाव अजय सादिश काळे,रा. वाळुंज पारगाव, ता. जि. अहिल्यानगर (फरार) असे सांगितले.

पंचासमक्ष अंगझडती घेतली असता आरोपींकडून १ लोखंडी कटावणी (₹५००), १ लोखंडी ऍडजस्टेबल पान्हा (₹२००), २ गलोल (₹२००) आणि १ मोटारसायकल (₹५०,०००) असा एकूण ₹५०,९०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.विशेष म्हणजे,सगड्या उंब-या काळे याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांत दरोडा, खून, चोरी, घरफोडी यांसारखे एकूण १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच मिथुन उंब-या काळे याच्यावर अहिल्यानगर व पुणे ग्रामीण जिल्ह्यात ७ गंभीर गुन्हे, तर सार्थक सगड्या काळे याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यात ६ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.या सर्व आरोपीं विरुद्ध सुपा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ४४३/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१०(४), ३१०(५) अन्वये दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुपा पोलीस स्टेशन करत आहे.ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री.सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली असून, या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

No comments