फेसबुक-व्हॉट्सॲपवर बदनामी, खोट्या केसेसची धमकी..! पोलिसी कारवाई नाही तर २९ डिसेंबरला सामाजिक कार्यकर्ते राहुल फुलारे आमरण उपोषणावर ठाम सच...
फेसबुक-व्हॉट्सॲपवर बदनामी, खोट्या केसेसची धमकी..! पोलिसी कारवाई नाही तर २९ डिसेंबरला सामाजिक कार्यकर्ते राहुल फुलारे आमरण उपोषणावर ठाम
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.२२):-शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथील रहिवाशी अमोल ऊर्फ अंबादास किसन वाघ याच्याकडून होत असलेला मानसिक त्रास,सोशल मीडियावर बदनामी तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्यांबाबत तात्काळ कारवाई करावी,अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा राहुल फुलारे या तक्रारदाराने निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत राहुल बालासाहेब फुलारे (रा. मु.पो. शहर टाकळी, ता. शेवगाव,जि. अहिल्यानगर) यांनी पोलीस अधीक्षक,अहिल्यानगर, जिल्हाधिकार्यालय अहिल्यानगर यांच्याकडे सविस्तर निवेदन दिले आहे.या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की,अमोल ऊर्फ अंबादास किसन वाघ व त्याची पत्नी (रा.शहर टाकळी, ता.शेवगाव) हे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सातत्याने मानसिक छळ करत आहेत.तक्रारीनुसार, संबंधित गैरजर्जदार सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी कारक वक्तव्ये करून समाजात प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असून,वारंवार खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या देत आहे.यामुळे तक्रारदार व त्यांच्या कुटुंबाला भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी दि.२९/१०/२०२५ व १५/११/२०२५ रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात लेखी निवेदने देण्यात आली होती.मात्र, आजपर्यंत अमोल ऊर्फ अंबादास किसन वाघ याच्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही,असा गंभीर आरोप तक्रारदाराने केला आहे.निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की,अमोल ऊर्फ अंबादास किसन वाघ याने अनेक लोकांकडून पैसे घेतले असून ते पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली आहे.यासंदर्भात जिल्ह्यात विविध ठिकाणी त्याच्या विरोधात तक्रारी दाखल असून त्याच्यापासून तक्रारदाराच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ अटक करून योग्य ती चौकशी करावी तसेच तक्रारदारास संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.अन्यथा,दि.२९/१२/२०२५ रोजी कुटुंबासह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.या प्रकरणामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


No comments