adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सांगवी बु!! येथे प्रधानमंत्री सौर घर मोफत वीज योजनेंतर्गत जनजागृती शिबिर

 सांगवी बु!! येथे प्रधानमंत्री सौर घर मोफत वीज योजनेंतर्गत जनजागृती शिबिर   यावल ता. प्रतिनिधी :-  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सांगवी बु!! ...

 सांगवी बु!! येथे प्रधानमंत्री सौर घर मोफत वीज योजनेंतर्गत जनजागृती शिबिर  


यावल ता. प्रतिनिधी :- 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सांगवी बु!! ता. यावल येथे गुरुवार, दि. 19 डिसेंबर 2025 रोजी महावितरण कंपनीमार्फत प्रधानमंत्री सौर घर मोफत वीज योजना अंतर्गत विशेष जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर फैजपूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. नितीनकुमार पाटील व सहाय्यक अभियंता श्री. राहुल कवठे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरामध्ये ग्रामस्थांना विज बिलावरील नाव बदल प्रक्रिया, तसेच प्रधानमंत्री सौर घर योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. सौर ऊर्जेचा वापर करून वीज बिलामध्ये कशी बचत करता येईल, याबाबत उपस्थित नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये सौर ऊर्जेबाबत सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळाला.

या कार्यक्रमास सांगवी बु!! गावातील मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महावितरणचे कर्मचारी श्री. सुरेश मोरे (लाईनमन), श्री. महेंद्र महाजन, श्री. हर्षवर्धन तळेले, जुबेर ,योगेश बारी, गोविंदा भास्कर,सचिन चौधरी,स्वाती मोरे, ऋषिकेश इंगळे तसेच इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच या कार्यक्रमासाठी सांगवी बुद्रुक गावाचे प्रभारी सरपंच श्री. अतुल फिरके, माजी सरपंच श्री. विकास धांडे व ग्रामविकास अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या जनजागृती शिबिरामुळे गावातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार असून, सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज खर्चात लक्षणीय बचत होईल, असा विश्वास उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला. 


No comments