adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धरणगाव तहसिलमध्ये तलाठ्यांचे लाक्षणिक उपोषण... लेखणी बंद आंदोलन व तीव्र निषेध...

 धरणगाव तहसिलमध्ये तलाठ्यांचे लाक्षणिक उपोषण... लेखणी बंद आंदोलन व तीव्र निषेध... विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धरणगाव -- ...

 धरणगाव तहसिलमध्ये तलाठ्यांचे लाक्षणिक उपोषण...

लेखणी बंद आंदोलन व तीव्र निषेध...


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव -- येथील तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघ यांच्यातर्फे आज तहसिल कार्यालयात लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मौजे पिंप्राळा, ता. जळगाव येथे दि. १ डिसेंबर २०२५ रोजी तलाठी मंडळ अधिकारी यांचे झालेले अन्यायकारक निलंबन व मौजे मांडळ, तालुका अमळनेर येथे दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी तलाठी मंडळ अधिकारी यांच्यावर वाळू माफियाने केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा तसेच १५ दिवस उलटूनही आरोपी अटक न झाल्याने तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघ यांच्यातर्फे तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यावेळी आंदोलनकर्ते ग्राम महसुल अधिकारी, मंडळ अधिकारी, संवर्गातील महसुल सहाय्यक अधिकारी आदींनी सहभाग नोंदवला.

No comments