adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

१५० मुलांनी पोस्टाच्या पत्राचा वापर करून पालक व शाळेला पाठवली पत्र

 १५० मुलांनी पोस्टाच्या पत्राचा वापर करून पालक व शाळेला पाठवली पत्र  मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जे ई स्क...

 १५० मुलांनी पोस्टाच्या पत्राचा वापर करून पालक व शाळेला पाठवली पत्र 


मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जे ई स्कूल आणि ज्यु कॉलेज च्या १५० हून अधिक मुलांनी प्रत्यक्ष पत्र लेखन  उपक्रमाच्या माध्यमातून कृतीयुक्त शिक्षणाची  अनुभूती घेतली.

गेल्या बारा तेरा वर्षांपासून शाळेतील उपक्रमशील शिक्षक एस आर ठाकूर  स्वखर्चाने पोस्टातील पत्र आणून प्रत्यक्ष पत्र लेखन उपक्रम घेत आहेत.विद्यार्थ्यांच्या कृतीयुक्त शिक्षणावर भर देता यावा याच माध्यमातून आज हा उपक्रम विद्यार्थ्याच्या प्रचंड सहभागाने संपन्न झाला.


सुरवातील उपक्रमाची माहिती व स्वरूप एस आर ठाकूर यांनी सांगितले. प्राचार्य व्ही एम चौधरी यांनी पत्र लेखन आणि पोस्ट विभागाच्या वेगवेगळ्या उपक्रमाचा लेखाजोखा मांडला.आपल्या अध्यक्षीय भाषणातून उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. इयत्ता ९वी व १०वी च्या १५० हून अधिक मुलांनी औपचारिक व अनौपचारिक स्वरूपाचे उत्कृष्ठ पत्र लेखन केले.मुलांनी आपल्या पालकांना,भाऊ - बहीण तथा मुख्याध्यापक,शिक्षक आणि शालेय प्रशासनाला आपल्या परीने पत्र लिहून आपला निरोप या माध्यमातून पोहचविला.या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला अशा कृतीयुक्त उपक्रमाची अनुभूती मिळाल्याचा आनंद त्यांनी आपल्या लिखाणातून व्यक्त केला.तसेच अशाच काही नवोपक्रम राबविण्याची इच्छा ही यातून व्यक्त केली. उपक्रमास संस्थेचे सचिव डॉ सी एस चौधरी यांनी ही भेट देऊन मुलांनी लिहिलेल्या पत्रांचे अवलोकन करत त्यांना मार्गदर्शन केले.उपक्रमाबाबत  खूप समाधान व्यक्त कले.प्रसंगी पर्यवेक्षक आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.

No comments