adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हृदय पिळवटून टाकणारा धक्कादाय प्रकार..! आईबाप झाले तीन महिन्याच्या बाळाचे शत्रू..निरागस शिवांश चा गळा दाबून केला खून..स्थानिक गुन्हे शाखेने तपासातून केले उघड

  हृदय पिळवटून टाकणारा धक्कादाय प्रकार..! आईबाप झाले तीन महिन्याच्या बाळाचे शत्रू..निरागस शिवांश चा गळा दाबून केला खून..स्थानिक गुन्हे शाखेन...

 हृदय पिळवटून टाकणारा धक्कादाय प्रकार..! आईबाप झाले तीन महिन्याच्या बाळाचे शत्रू..निरागस शिवांश चा गळा दाबून केला खून..स्थानिक गुन्हे शाखेने तपासातून केले उघड 


सचिन मोकळं अहिल्यानगर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड) 

अहिल्यानगर (दि.९):-संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील मुळा नदीवरील पुलाखाली आढळलेल्या तिन महिन्याच्या अज्ञात बालकाच्या मृत्यूमागील रहस्य अखेर उलगडले आहे. स्वतः आई-वडिलांनीच आपल्या चिमुकल्या शिवांशचा गळा दाबून खून करून प्रेत नग्न अवस्थेत पुलावरून खाली फेकून दिल्याचे धक्कादायक सत्य स्थानिक गुन्हे शाखाने उघड केले आहे.या प्रकरणात आई-वडिलांसह तिसरा साथीदार हरिदास राठोड यालाही अटक करण्यात आली आहे.दि.4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9.16 वाजता आंबीखालसा येथील अशोक धोंडीराम माळी यांनी पुलाखालील काटेरी झुडपात 3-4 महिने वयाच्या बालकाचा मृतदेह पाहताच घारगाव पोलिसांना कळवले.

घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंदवून तपास सुरू झाला.या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पोनि. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात पोउपनि/समीर अभंग, पोलिस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे,फुरकान शेख,दीपक घाटकर,राहुल डोके,अमृत आढाव,बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डीले,प्रशांत राठोड व महिला पोलिस अंमलदार भाग्यश्री भिटे यांचा समावेश होता.घटनास्थळी पाहणीमध्ये हा प्रकार अकस्मात नसून घातपाताचा असल्याचे स्पष्ट झाले.पथकाने वाहनांच्या हालचालींची पडताळणी,गोपनीय माहिती आणि कौशल्याचा वापर करून महत्त्वाचा धागा पकडला बालकाला फेकण्यासाठी वापरलेली कार ही जालना जिल्ह्यातील असल्याचे समजले.भोकरदन परिसरात चौकशीत कळाले की

कविता जाधव हिच्या नातेवाईकांमध्ये “बाळाचे छत्रपती संभाजीनगर येथे ऑपरेशन झाले आहे” अशी अफवा पसरवण्यात आली होती.त्यातून संशयाची साखळी तयार झाली.पोलिस पथकाने  प्रकाश पंडित जाधव (वय 37),कविता प्रकाश जाधव (वय 32),हरिदास गणेश राठोड (वय 32) यांची चौकशी केली असता त्यांचे उत्तर चुकचुकीत असल्याने त्यांना स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात आणून सखोल चौकशी केली.कठोर चौकशीत आरोपींनी कबुली दिली की—

3 डिसेंबर रोजी ते हरिदास राठोडच्या इर्टिगा कार (MH-02-EH-5354) मधून तीन महिन्याचा मुलगा शिवांश उर्फ देवांश याला घेऊन पुण्याकडे निघाले.घारगावमधील नदीच्या पुलाजवळ गाडी उभी करून आई-वडिलांनीच बाळाचा गळा आवळून,कपडे काढून टाकून नग्न अवस्थेत खाली फेकून दिले.अकस्मात मृत्यूच्या तपासातून हा खून असल्याचे निष्पन्न झाल्याने घारगाव पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 370/2025, भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103(1), 238 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

No comments