adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर शहरासह परिसरात अवैध वाळू वाहतूक दारावर कठोर कारवाई करावी. अन्यथा उपोषणाचा इशारा फैजपूर प्रांत अधिकारी यांना निवेदन

 फैजपूर शहरासह परिसरात अवैध वाळू वाहतूक दारावर कठोर कारवाई करावी. अन्यथा उपोषणाचा इशारा  फैजपूर  प्रांत अधिकारी यांना निवेदन  इदू पिंजारी फै...

 फैजपूर शहरासह परिसरात अवैध वाळू वाहतूक दारावर कठोर कारवाई करावी. अन्यथा उपोषणाचा इशारा 

फैजपूर  प्रांत अधिकारी यांना निवेदन 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 येथील गेल्या तीन ते चार महिन्यापासून फैजपुर सह परिसरात अवैध वाळू बिनधास्त आणि जोराने सुरू असून या अवैध वाहतूक रोखण्यास महसूल विभाग आणि पोलीस प्रशासक बघायची भूमिका घेत आहे काय असा प्रश्न निवेदनात करण्यात आला आहे. तरी याबाबत महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त आणि कठोर कारवाई करून त्यामुळे महसूल विभागाचा दररोज होणारा लाखोंचा उत्पन्न बुडत आहे शहरातील मिल्लत नगर भाग नवीन वस्ती झोपडपट्टी महानगर यांच्यासह अनेक भागांमध्ये दररोज झोपडपट्टी मध्ये राहणारे दोन  व्यक्ती  विशिष्ट समाजाचे   अंगावर भगवा रुमाल टाकून सत्ताधारी पक्षाला बदनाम बदनाम करीत असल्याचे सर्वत्र नागरिकांना पाहायला मिळत आहे.  तसेच मधुकर सहकारी साखर कारखाना हा परिसर वाळू माफिया चा केंद्रबिंदू  बनलेला असून या ठिकाणातून फैजपुर सह परिसरात  वाळूचे डंपर जमा होऊन रात्री 10 वाजेच्या नंतर त्यांची रात्रभर वेगवेगळ्या  ठिकाणी विल्हेवाट लावली जात आहे

 येथील झोपडपट्टीत राहणारे हे दोन्ही व्यक्ती दररोज दहा ते पंधरा डंपर बिनधास्तपणे फैजपूर शहरात सर्वत्र टाकून सकाळी मोकळे होतात प्रशासन झोपेत असतो आणि हे वाळू माफिया  त्यांचे काम पूर्ण काम करून घेतात आणि दिवसभर नियोजन करून घेतात महसूल विभाग आणि पोलीस प्रशासक यांनी संयुक्त मोहीम राबवून कठोर कारवाई करावी अशी मागणी फैजपूर शहरातील पत्रकार सलीम पिंजारी यांनी फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी  बबनराव काकडे यांच्याकडे लेखी निवेदन  देऊन विनंती केली आहे. निवेदनात म्हटले आहे की येत्या दिवसात या वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी तसेच अवैध वाळू कायमस्वरूपी बंद करावी अन्यथा उपोषणाला बसावे लागेल असेही निवेदनात नमूद केले आहे

No comments