adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गटनेतेपदी सौ. वर्षा चोपडे यांची निवड; विरोधकांना चांगलीच चपराक नगरपालिका निवडणुकीनंतर राजकीय हालचालींना वेग — नागरिकांच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य देण्याचा निर्धार

 राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गटनेतेपदी सौ. वर्षा चोपडे यांची निवड; विरोधकांना चांगलीच चपराक नगरपालिका निवडणुकीनंतर राजकीय हालचालींना वेग —...

 राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गटनेतेपदी सौ. वर्षा चोपडे यांची निवड; विरोधकांना चांगलीच चपराक

नगरपालिका निवडणुकीनंतर राजकीय हालचालींना वेग — नागरिकांच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य देण्याचा निर्धार  


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर यावल शहराच्या राजकारणात घडामोडींना वेग आला असून, त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रभाग क्रमांक ९-अ मधून विजयी झालेल्या नगरसेविका सौ. वर्षाताई नीरज उर्फ आकाश चोपडे यांची नगरपालिकेच्या गटनेतेपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली.

याचवेळी अंजुम खान यांची प्रतोदपदी निवड करण्यात आली. या दोघांच्या निवडीचे शहरभरातून स्वागत होत असून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

"नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचे प्रश्न, समस्या आणि विकासकामांना सर्वप्रथम प्राधान्य देऊन जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरू," असा विश्वास नवनियुक्त गटनेत्या सौ. वर्षाताई चोपडे यांनी व्यक्त केला.

या निवडीमुळे "वर्षाताई गटनेते होणार नाहीत" असे भाकीत करणाऱ्यांना चांगलीच राजकीय चपराक बसल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

या प्रसंगी राष्ट्रवादी महिला अजित पवार गटाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे, भगतसिंग बापू पाटील, तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नवनियुक्त गटनेते व प्रतोद यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

No comments