नववर्षाच्या स्वागतासाठी रक्तदानाचा संकल्प यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट व वंदे मातरम् परीवारातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन चंद्रकांत पाटील वि...
नववर्षाच्या स्वागतासाठी रक्तदानाचा संकल्प
यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट व वंदे मातरम् परीवारातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
चंद्रकांत पाटील विचखेडा
(संपादक हेमकांत गायकवाड)
चोपडा : रक्तदान… सर्वश्रेष्ठ दान या सामाजिक जाणिवेतून आणि एक पाऊल माणुसकीकडे या संकल्पनेतून यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, चोपडा व वंदे मातरम् परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी समाजासाठी काहीतरी योगदान देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, या शिबिरात भव्य रक्तदान शिबिरासह अवयवदान व देहदान नोंदणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. चोपडा व चोपडा तालुक्यातील नागरिकांसाठी रक्तदान करण्याची ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात. रक्तदान करा आणि अपार पुण्यसंपादन करा असा संदेश देत आयोजकांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. रक्तदानातून माणुसकीची नाती जुळतात आणि नवसंजीवनी मिळते असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
हे रक्तदान शिबिर यशोधन दातांचे व डोळ्यांचे हॉस्पिटल, नारायण वाडी, यावल रोड, चोपडा येथे आयोजित करण्यात आले असून दिनांक १ जानेवारी २०२६, गुरुवार रोजी सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत शिबिर सुरू राहणार आहे.
या उपक्रमासाठी हेल्थ इन वेल्थ ग्रुप, डॉ. राहुल पाटील मित्र परिवार, श्री श्याम बाबा परिवार, दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय तसेच पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी एक चांगला संकल्प करून किमान एकदा तरी रक्तदान करा आणि समाजासाठी जीवनदायी योगदान द्या, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

No comments