अखेर प्रहारच्या वचकाने रस्ता,नालीचे काम लागले मार्गी, रहिवाशी नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण मागील दिवसापासून आश्वासन देत याकडे ग्रामपंचायत ...
अखेर प्रहारच्या वचकाने रस्ता,नालीचे काम लागले मार्गी, रहिवाशी नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण
मागील दिवसापासून आश्वासन देत याकडे ग्रामपंचायत संबंधितांचा होता हलगर्जीपणा
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष मा. बच्चूभाऊ कडू यांच्या विचारधारी प्रेरणेने जिल्हा प्रमुख वैभवराजे मोहिते, उपजिल्हा प्रमुख अजय टप यांच्या मार्गदर्शनाखाली जिथं अन्याय तिथं प्रहार झालाच पाहिजे या ब्रीद वाक्यप्रमाणे गेली कित्तेक वर्ष पासून प्रहार शाखा लोणवडी हे गावात कार्य करत आहे आतापर्यंत प्रहार जनशक्ती पक्ष यांना गावात निवेदनाद्वारे सरकारी दवाखाना लागून असलेले मुतारी हटून,बस स्टँड जवळ बांधने, बस स्टँड वरती टिन पत्र,मुख्य चौकात सी सी टीव्ही कॅमेरा,आर ओ प्लान, नाली साफ सफाई,बंद कचरा गाडी चालू करणे,मंजुरात झालेले 15 वित्त कामे लवकर चालू करणे, विहिरीतील कचरा सफाई,पावसाळ्यात योग्य ठिकाणी रस्त्यात मुरुम हे आवश्यक असलेले कामे प्रहारच्या कार्याने लोणवडी गावात मार्गी लागली त्यात मागील 3 महिन्यापासून वॉर्ड नंबर 3 मध्ये नाली,रस्ता संदर्भात ग्रामपंचायत यांना प्रहार कार्यकर्ता राहुल बावस्कार यांनी निवेदन दिले होते 2 महिने कालावधी उलटूनही ग्रामपंचायत यांनी कोणतीच भूमिका घेतली न्हवती त्यांना निवेदन प्रतिउत्तर मागितले असता 15 दिवसात काम करतो लेखी प्रतिउत्तर दिले पुढील लेखी दिवस होऊन पण काम न केल्याने प्रहार कार्यकर्ते यांनी माहित विचारल्यास संबंधित सरपंच हे आता आचार सहित चालू आम्ही करूच काम असे बोलून भूलथापा देत होत्या शेवटी प्रहार कार्यकर्ते या कामासंदर्भात वरिष्ठ यांच्या कडे धाव घेणार असल्याचे माहिती पडतात आज ग्रामपंचायत यांनी कामाला सुरुवात करून काम मार्गी लावले. मार्गी लागलेल्या कामाबद्दल ग्रामपंचायत यांचे प्रहारच्या वतीने आभार मानण्यात आले. यामध्ये प्रहार कार्यकर्त्यांची ठाम भूमिका व वार्डातील नागरिकांचे सहकार्य लाभले.

No comments