पशु वैद्यकीय दवाखान्याच्या पूर्व दिशेस असलेल्या क्षेत्रामधील पत्र्याचे शेड चे अतिक्रमण हटविण्याबाबत निवेदन सादर पष्टाणे ता.धरणगाव प्रतिनिध...
पशु वैद्यकीय दवाखान्याच्या पूर्व दिशेस असलेल्या क्षेत्रामधील पत्र्याचे शेड चे अतिक्रमण हटविण्याबाबत निवेदन सादर
पष्टाणे ता.धरणगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ग्रामपंचायत पष्टाणे बु ता. धरणगांव जि जळगांव या गावातील (सरकारी) गट क्रमांक २५२/१/अ मधील पशु वैद्यकीय दवाखान्याच्या पूर्व दिशेस असलेल्या क्षेत्रामधील पत्र्याचे शेड चे अतिक्रमण हटविण्याबाबत / काढण्याबाबमा. गट विकास अधिकारी, धरणगांव कार्यालयात पं.स. धरणगांव यांच्याकडे दिलेला अतिक्रमण हटविण्याबाबत काढण्याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले असून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
वरील विषयास अनुसरून मी अर्जदार विनंती पूर्वक निवेदन सादर करतो की, शासकीय जमिनीवरील अतिक्रमणास प्रतिबंध करणे व झालेली अतिक्रमणे तात्काळ निष्कासित करण्याबाबत वेळोवेळी शासन आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. तरी, त्यानुषंगाने गांभीर्यपूर्वक कार्यवाही होत नसल्याने शासकीय जमिनी कब्जा / अतिक्रमणे करून बळकावण्यात येत आहेत. तसेच, सरकारी जमीन वैयक्तिकरित्या वापरण्याची परवानगी नसते, तरी सुद्धा मा. ग्रामपंचायत पष्टाणे बु ता. धरणगांव जि जळगाव या गावातील गृप ग्रामपंचायत पष्टाणे बु च्या मालकी असलेल्या शासकीय जमीन क्षेत्रात, गट क्रमांक २५२/१/अ मध्ये पशु वैद्यकीय दवाखान्याच्या पूर्व दिशेस अनधिकृतपणे पत्र्याचे शेड टाकून कब्जा। अतिक्रमण करण्यात आलेले आहे. त्या बाबत मी स्वतः अर्जदाराने दिनांक २९/०७/२०२५ रोजी अतिक्रमण हटविण्याबाबत मा. गट विकास अधिकारी पं.स धरणगाव, मा. तहसीलदार सो. धरणगाव यांना अर्ज दिलेला आहे, तरी आता पर्यंत सदर अतिक्रमण हटविण्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही तरी, आपण सदरील सरकारी जमिनीवरील कब्जास । अतिक्रमणास प्रतिबंध करणे व झालेली अतिक्रमण तात्काळ निष्कासित करणे. हि नम्र विनंती अशा आशयाचे निवेदनकर्त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे

No comments