पत्नीचे अनैतिक संबंधातून पतीने गळफास घेवुन संपविले जीवन, पत्नीसह दोन प्रियकरांवर माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल माधवी गिरी गोसावी (सोलाप...
माधवी गिरी गोसावी (सोलापूर जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सोलापूर माळशिरस तालुक्यांतून पिलिव गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पत्नीच्या जाचाला कंटाळून व अनैतिक संबंधातून पतीने आत्महत्या केल्याची घटना माळशिरस तालुक्यांत पिलिव येथे घडली आहे. पोपट राजाराम जाधव ( वय 33 ) रा. पिलीव ता. माळशिरस असे जीवन संपवलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून पोपट जाधव आणि निकिता जाधव (वय 22) हिचे अविनाश सुळे (वय 25) रा. आष्टी मोहोळे आणि अजित सुळे (वय 30) रा. आष्टी मोहोळे ) या दोन प्रियकरांसोबत अनैतिक संबंधांची होते. या अनैतिक संबंधाची माहिती पती पोपट जाधव कळल्याने नाही तो नैराश्य होता. वारंवार सांगूनही निकिता हिचे अनैतिक संबंध चालूच होते. या तिच्या त्रासाला कंटाळला होता शेवटी (दि. 27) नोव्हेंबर रोजी त्यांनी रस्त्या घरात गळफास घेवुन जीवन संपविले, याबाबत पोपट याचा भाऊ सागर राजाराम जाधव यांनी सोमवारी माळशिरस पोलीस ठाण्यात तक्रार दिली पत्नीसह तिच्या दोन प्रियकरांच्या त्रासाला कंटाळून पोपट याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी निकिता जाधव अविनाश सुळे अजित सुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अविनाश आणि निकिता या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गोसावी करीत आहेत.

No comments