adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

HIV-AIDS जनजागृती कार्यक्रम संपन्न जागतिक एड्स दिन सप्ताह

 HIV-AIDS जनजागृती कार्यक्रम संपन्न जागतिक एड्स दिन सप्ताह  धरणगाव प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, धर...

 HIV-AIDS जनजागृती कार्यक्रम संपन्न

जागतिक एड्स दिन सप्ताह 


धरणगाव प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, धरणगाव आणि आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने HIV-AIDS जनजागृती कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य एड्स निवारण संस्था, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जळगाव, प्लॅन इंटरनॅशनल इंडिया व वन स्टॉप सेंटर जळगाव यांच्या संयुक्त सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज पाटील, इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या एस. एस. पाटील तसेच आदर्श विद्यालयाचे प्राचार्य संदीपकुमार सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


कार्यक्रमात पोस्टर प्रदर्शन, शपथ ग्रहण, मार्गदर्शन सत्र, तसेच रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये HIV-AIDS संदर्भात व्यापक जनजागृती करण्यात आली.समुपदेशक ज्ञानेश्वर शिंपी यांनी एड्स नियंत्रण कार्यक्रम, संसर्ग होण्याची कारणे, निदान प्रक्रिया, उपचारपद्धती, प्रतिबंधात्मक उपाय, एचआयव्ही-अेड्स कायदा 2017, तसेच एड्स जनजागृती अभियानात युवकांची भूमिका यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

ग्रामीण रुग्णालयातील राष्ट्रीय किशोर वयीन कार्यक्रमाचे समुपदेशक गणेश कुंभार यांनी किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या शंका-समस्या, आरोग्यविषयक गरजा आणि पोषण आहाराचे महत्त्व याबाबत उपयुक्त माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. विजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांसमवेत शपथ व प्रतिज्ञा देत कार्यक्रमाचा समारोप केला. या कार्यक्रमास इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, क. विभाग प्रमुख एस. एन. चौधरी, मान्यवर प्राध्यापक, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आरोग्य विभागाचे समुपदेशक गणेश कुंभार, ज्ञानेश्वर शिंपी, राजेश्वर काकडे, संकेत गुरव, पियुष चौधरी, जितेंद्र चव्हाण तसेच सर्व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments