adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पोलीस खात्यात नेहमीच प्रयत्नशील, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांची मुंबई ला बदली!

पोलीस खात्यात नेहमीच प्रयत्नशील, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांची मुंबई ला बदली!   संभाजी पुरी गोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी. (संपादक -:...

पोलीस खात्यात नेहमीच प्रयत्नशील, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांची मुंबई ला बदली! 


 संभाजी पुरी गोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 प्रशासकीय नोकरी म्हटलं की बदली हा विषय नक्कीच समोर येतो. पण काही अधिकाऱ्यांच्या बदलीने परिसरांतील नागरिक मात्र चांगलेच भावुक होत असताना दिसून येतात. आणि अशाच बदलीने राजगड पोलीस ठाण्याच्या आणि किकली परिसरांतील नागरिकांस कॉलेजच्या मुली देखील चांगल्याच भावुक झाल्या आहेत. बदली झालेल्या त्या महिला अधिकारी म्हणजे कर्तव्यदक्ष आणि डॅशिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई मॅडम या पुणे ग्रामीण विभागातील राजगड पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांची नुकतीच मुंबईला बदली झाली आहे. त्यांनी यापूर्वी सातारा जिल्ह्यात शिरवळसह विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा दिली आहे.सातारा जिल्हा पोलिस दलात कार्यरत असतानाही अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्यांना यश आले आहे. तसेच कोरोना काळातही नेहमी नागरिकांना आपली काळजी घ्या आपल्याला काही अडचण असल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क साधा असा याचा इशारा करीत त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले होतं. निर्भया पथकांत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. कॉलेजच्या परिसरांत असणाऱ्या टवाळखोरांना देखील त्यांनी चांगलाच धडा शिकवला होता. जिल्ह्यातील उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्या हस्ते प्रशासकीय पत्रक देवुन त्यांना गौरविण्यात आले होते. सातारा जिल्ह्यातील कालावधी पूर्णता झाल्यानंतर त्यांची पुणे ग्रामीण पोलीस दलात बदली झाली होती बदली झाल्यानंतर त्यांना पुन्हा शिरवळ पोलीस ठाण्याच्या बाजूचेच राजगड पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती झाली होती. तिथेही त्यांनी राजगड पोलीस ठाणे अंकित या किकली पोलीस दूरक्षेत्राचा कार्यभार अतिशय उत्कृंष्टपणे सांभाळला होता. त्यांनी आपल्या कार्यकाळात देखील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिल्या. सातारा पुणे ग्रामीण अशा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात नेहमीच त्या प्रयत्नशील ठरल्या. कर्तव्यदक्ष आणि डॅशिंग महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांची चांगलीच पोलीस खात्यात ओळख आहे. त्यांच्या बदलीमुळे राजगड पोलीस ठाणे आणि किकली पोलीस दूरक्षेत्राच्या परिसरांतील सर्वसामान्य नागरिकांसह कॉलेजच्या मुलीं देखील भावुक झाल्या आहेत. अशा या कर्तव्यदक्ष महिला पोलीस उपनिरीक्षकांस मुंबईतील पुढील सेवेसाठी रोखठोक महाराष्ट्र ग्रुप मधील सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच पत्रकार बांधवांकडून हार्दिंक हार्दिंक शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन.

No comments