शिर्डी येथे बाळासाहेब वाघ व किरण मदने यांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मान.. शिर्डी प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) नुकताच शिर्डी ये...
शिर्डी येथे बाळासाहेब वाघ व किरण मदने यांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मान..
शिर्डी प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नुकताच शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरीय वधू-वर-पालक परिचय मेळाव्यात संगमनेर येथील राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे तालुकाध्यक्ष श्री बाळासाहेब वाघ व प्रवक्ते श्री किरण मदने यांना कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांना हा पुरस्कार समाजातील संघटन आणि सामाजिक बांधिलकी, जनजागृती या कार्यासाठी देण्यात आला. या दोघांनी संगमनेर तालुक्याबरोबर जिल्ह्यातील नाभिक समाजाच्या समस्या आणि सामाजिक प्रश्नांची उकल करण्याचे काम समाजातील युवक, युवतींना सामाजिक उपक्रमात सहभागी करून त्यांना जबाबदारीचे कामाची वाटणी केली यामुळे समाजातील प्रतिनिधींची निवड पुढील काळात करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी नाभिक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री भगवान अण्णा बिडवे, प्रदेश कार्याध्यक्ष श्री किरण बिडवे, जिल्हाध्यक्ष साईभक्त श्री मनोज वाघ, नाभिक समाज वधु-वर समिती, आयोजन समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समाजाच्या विश्वासाला पात्र ठरू असे आश्वासन त्यांनी दिले. तालुक्यातून विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

No comments