जि. प. मराठी शाळा महेलखेडी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महेलखेडी ता. यावल ज...
जि. प. मराठी शाळा महेलखेडी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महेलखेडी ता. यावल जि. प. मराठी शाळा, महेलखेडी येथे आदिवासी तडवी भिल्ल युवा कृती समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्साह निर्माण झाला असून पालक व ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.
या कार्यक्रमास आदिवासी तडवी भिल्ल युवा कृती समितीचे अध्यक्ष श्री. अजित (राजू) तडवी, श्री. सकावत तडवी, श्री. मुराद तडवी उपस्थित होते. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. युनुस तडवी, ग्राम महसूल अधिकारी श्रीमती अंजुम तडवी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली कोष्टी मॅडम व शिक्षक श्री. आसिफ तडवी सर यांची उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाचे महत्त्व पटवून देत शिक्षण हे उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. आदिवासी तडवी भिल्ल युवा कृती समितीच्या या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाबद्दल उपस्थितांनी कौतुक व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षकवृंद व समितीच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments