adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

🔴निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांदणी चौकात वाहतूक पोलिसांची धडाकेबाज नाकाबंदी..६३ वाहनधारकांवर कारवाई..

 🔴निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांदणी चौकात वाहतूक पोलिसांची धडाकेबाज नाकाबंदी..६३ वाहनधारकांवर कारवाई.. सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हे...

 🔴निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांदणी चौकात वाहतूक पोलिसांची धडाकेबाज नाकाबंदी..६३ वाहनधारकांवर कारवाई..


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (प्रतिनिधी):- महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर वाहतूक शाखेने मंगळवार दि.२३ डिसेंबर रोजी चांदणी चौकात दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत विशेष नाकाबंदी राबवली.

या नाकाबंदी दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटारवाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.त्यामध्ये

फॅन्सी नंबर प्लेट – ३ केसेस

विना नंबर प्लेट – १२ केसेस

विना सीटबेल्ट – ९ केसेस

विना लायसन्स – १२ केसेस

ट्रिपल सीट – १३ केसेस

ब्लॅक फिल्म – ७ केसेस

नो एन्ट्री उल्लंघन – ५ केसेस

ड्रंक अँड ड्राइव्ह – २ केसेस

अशा एकूण ६३ केसेस नोंदवून ५९,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.ही कारवाई  पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे,पीएसआय अण्णासाहेब परदेशी,हवालदार मुस्ताक शेख,हवालदार रमेश फुलमाळी,पोलीस कॉन्स्टेबल राहुल काळे,अमोल घंगाळे, मधुकर ससे,पोलीस नाईक रामकुमार सूर्यवंशी व चालक विकास गडदे यांनी सहभाग घेतला.निवडणूक काळात वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments