चुंचाळ्यात गुरुवारी दत्त जंयती निमीत्त कार्यक्रम श्री दत्त पारायणाची सांगता भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सातप...
चुंचाळ्यात गुरुवारी दत्त जंयती निमीत्त कार्यक्रम श्री दत्त पारायणाची सांगता
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले चुंचाळे हे गाव श्री संमर्थ सुकनाथ बाबा यांची तपोभुमी व रघुनाथ बाबा यांची जन्मभुमी तसेच श्री संमर्थ वासुदेव बाबा यांची कर्मभुमी म्हणून संपुर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातही प्रचलीत आहे श्री संमर्थ वासुदेव बाबा यांनी चुंचाळ्यात आपल्या शिष्याच्या मदतीने आपले आजागुरु म्हणजे सुखनाथ बाबा यांच्या नावाने मोठे दरबार या ठिकाणी उभारले आहे त्यात दत्त मंदिर श्री राम मंदिर विठ्ठल रुख्मिनी मंदीर असे मंदीरे उभारले आहे यात विशेष म्हणजे दत्त जंयतीच्या एक दिवस अगोदर हजरत गैबनशाह बाबाचा यात्रोत्सव असतो त्यामुळे हजारोच्या उपस्थितीत भाविक दर्शनासाठी येथे येतात
तसेच या दरबारात सलग सात दिवस दत्त पारायणाचे वाचन सुरु असते व त्याचा समारोप दत्त जंयतीला होतो बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकासाठी चुंचाळे फाटा ते चुंचाळे पंर्यन्त येथील रिक्षा युनियन चे चालक व दरबारातील गाडी मोफत ये जा करतात
असा होईल कार्यक्रम सकाळी सहाला समाधी स्थान सातला मारोती स्थान आठ पासुन ते दुपारी 12 ते 1 आरती ची वेळ सोडून भजन व भारुडे होतात दुपारी 1 ते रात्री 7 पर्यत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे परिसरातील भंजनी मंडळानी उपस्थित रहावे असे आवाहन श्री संमर्थ वासुदेव बाबा भजनी मंडळाने केले आहे दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन वासुदेव बाबा शिष्य व चुंचाळे येथील ग्रामस्थांनी केले आहे

No comments