चोपडा तालुक्यात सध्या दारू उत्पादन शुल्क अधिकारी यांचे स्वतंत्र कार्यालय कार्यरत आहे. चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा ...
चोपडा तालुक्यात सध्या दारू उत्पादन शुल्क अधिकारी यांचे स्वतंत्र कार्यालय कार्यरत आहे.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुका हा तसा संवेदनशील तालुका म्हणून ओळखला जातो. अनं याच तालुक्याला लागून असलेल्या साधारण २५ ते ३० किलोमिटर अंतरावर मध्य प्रदेश राज्य आहे. चोपडा तालुक्यातील सिमेवर असलेल्या उमर्टी व मध्य प्रदेश राज्यातील जेथून सिमा सुरू होते त्या गावाचे नाव देखील उमर्टी ज्याला आपण पार ची उमर्टी असे देखील म्हणत असतो. या मध्य प्रदेश राज्यातील पारची उमर्टी येथे नुकतेच पुणे येथील एटीएस अधिकारी यांनी जळगाव येथे कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर मॅडम यांना विश्वासात घेऊन कोबिंग ऑपरेशन करून जवळपास ४५ आरोपींना पकडण्यात यश आले. व अनेक गावठी पिस्तूल बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे ही जप्त केले. परंतु या तालुक्यातील सत्रासेन-लासूर व वैजापूर नागलवाडी या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अवैध नकली दारू, गांजा, गावठी पिस्तूल , विमल यासारख्या वस्तू हे नेहमी पोलीसांना सापडत असतात.आणि त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येते. परंतु चोपडा येथे कार्यरत असलेल्या दारू उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकारी, कर्मचारी हे अज्ञात व्यक्तीकडून पैसे उकळत असल्याची गोपनीय माहिती समोर Left आहे.अश्या लोकांचे हात हे भ्रष्टाचाराने भरले असतील तर कोणत्या अधिकाराने ते नंबर दोन वाल्यांवर कारवाई करतील? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जे कोणी अधिकारी,कर्मचारी अज्ञात व्यक्तीकडून अधिकार्यांच्या नावाने पैसे मागत असतील तर ते कितपत योग्य आहे?असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. अधिकारी यांच्या नावाने पैसे उकळणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्या वर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी तालुक्यातून होत आहे.

No comments