_जळगाव मध्ये थंडीच्या कडाका वाढला, पारा १०अंशाखाली नागरिक गारठले _सकाळी धुक्याची चादर, शाळकरी मुलांना, व वृद्धांना त्रास वाढला प्रतिनिधी ख...
_जळगाव मध्ये थंडीच्या कडाका वाढला, पारा १०अंशाखाली नागरिक गारठले
_सकाळी धुक्याची चादर, शाळकरी मुलांना, व वृद्धांनात्रास वाढला
प्रतिनिधी खलील आर तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून तापमानात मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे सोमवारी दिनांक १डिसेंबर सकाळी जिल्ह्यातील किमान तापमान १०.३अंश सेल्सियस इतके नोंदविले गेल्या २४ तासात तब्बल ५अंश तापमान घसरल्याने नागरिकांनी उबदार कपड्यांच्या आणि शेकोटीचा आधार घेतला आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार,३ते४ दिवस तापमान आणखी घट होण्याची शक्यता असून. हिवाळ्याची चाहूल अधिक तीव्र होणार आहे दिवसा तापमान थोडे वाढले तरी सकाळी व रात्रीच्या थंडी त फरक पडणार नाही. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे दरम्यान थंडीमुळे ग्रामीण भागात कामगार वर्गाने सकाळी उशिरा जाण्याचा पर्याय निवडला आहे. शेतकऱ्यांनी शेताचे पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपयोजना सुरू केल्या आहेत वैद्यकीय तज्ञांनी उबदार कपडे वापरणे, गरम पाण्याचे सेवन करणे आणि थंड वाऱ्यापासून स्वतःचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे थंडीचा हा अचानक वाढलेला कडाका पाहता नागरिकांनी सावधगिरी बागडणे आवश्यक असून, हिवाळ्याच्या हंगाम लांबणावर असे हवामान तज्ञांनी सुचित केले आहे


No comments