पुण्यात 15 बालविवाह रोखले; रोहिणी ढवळे यांच्या नेतृत्वातील जिल्हा महिला व बालविकास विभाग - पुणेच्या मोहिमेला मोठे यश. संभाजी पुरीगोसावी (प...
पुण्यात 15 बालविवाह रोखले; रोहिणी ढवळे यांच्या नेतृत्वातील जिल्हा महिला व बालविकास विभाग - पुणेच्या मोहिमेला मोठे यश.
संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पुण्याच्या ग्रामीण आणि शहरांत अजूनही बालविवाहाच्या घटना घडत असल्याने यामध्ये पुणे महिला व बालविकास कल्याण विभागाकडून जवळपास 15 विवाह रोखण्यात पुण्याच्या महिला बालकल्याण विकास विभागाच्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. यामध्ये नोव्हेंबर महिन्यांत 12 बालविवाह रोखण्यात आले तर ऑक्टोबर मध्ये 3 असे होते असलेले एकूण 15 बालविवाह एकाच वेळी रोखण्यात आले आहेत. यापैकी काहींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा महिला व बालकल्याण विभागांच्या अंतर्गत असलेल्या चाइल्ड हेल्पलाइन च्या आधारे हे बालविवाह रोखण्यात आले आहेत. बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. अशा विवाहांमुळे मुलींच्या आरोग्यावर शिक्षणावर आणि संपूर्ण आयुष्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे बालविवाह करणे किंवा प्रोत्साहन देणे हा कायद्याने गंभीर गुन्हा मानला जातो. इंदापूर तालुक्यांत एका घरात नातेसंबंधातील तीन अल्पवयीन मुलींचे विवाह एकाच दिवशी सुरू होते. याबाबत माहिती मिळताच चाइल्ड हेल्पलाइनच्या पथकांने ग्रामसेवक आणि स्थानिक पोलिसांसह तत्काळ घटनास्थळी घाव घेत तिन्ही विवाद थांबवले, पाषाण बावधन या परिसरांतही काही दिवसांपूर्वी बालविवाहांच्या दोन प्रकरणात कारवाया करून मुलींना सुरक्षित केले असल्याची माहिती पुणे जिल्हा संरक्षण कक्षाकडून देण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरांत कोणताही बालविवाह घडण्याची शक्यता असल्याची किंवा बालविवाह घडत असल्याची माहिती असल्यास त्यांनी आमच्या टोल फ्री-क्रमांक 1098 वर कळवता येईल याकरिता सर्वांनी पुढे येवुन माहिती दिली तर बालविवाह रोखण्यात आणखीन यश येईल असे आवाहन पुणे जिल्ह्याच्या महिला बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी केले आहे.

No comments