चौगाव किल्ल्याच्या पायथ्याशी सापडला नक्षीदार दगडांचा खजिना. विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा तालुक्यातील चौगाव येथे नु...
चौगाव किल्ल्याच्या पायथ्याशी सापडला नक्षीदार दगडांचा खजिना.
विश्राम तेले चौगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील चौगाव येथे नुकतीच शिव प्रतिष्ठान हिंदूस्थानच्या वतीने चौगाव किल्ला परीसरात शोध मोहीम घेण्यात आली.किल्ल्यावर तर आपण नेहमीच फिरतो पण किल्ल्याच्या पायथ्याशी व परीसरात अजून काही अवशेष आहेत का?याचा शोध घेणे हाच या मोहीमेचा मुख्य हेतू होता.किल्ल्याच्या पायथ्याशी बाजारपेठ (बजारपट्टा) म्हणतो त्या परीसरातही पुरातन बांधकामांचे अनेक अवशेष आहेत.तसेच पायथ्याशी अनेक घडीव दगड व नक्षीकाम केलेले खांब आढळून आलेत.यात खंडीत झालेला नंदी, अनेक नक्षीदार दगड, नक्षीदार खांब,मंदिराचा चौथरा असे अनेक अवशेष सापडले.अजून बरेच अवशेष हे मातीत दबलेले आहेत.यावरुन किल्ल्याच्या पायथ्याशी पण मंदिर असावे असे वाटते.तसेच दोन समाधीस्थळे पण आहेत.अनेक पायरींच्या आकाराचे घडीव दगड आहेत.यावरून किल्ल्याला पुर्ण पायर्या असाव्यात असा अंदाज येतो.तर नुकतेच चौगाव येथील काही दुर्गप्रेमी व वनमजूरांनी गवळी वाड्याची साफ सफाई केली.यात अनेक खोल्यांचे अवशेष दिसतात.सत्तावीस एकर मध्ये विस्तारलेल्या या किल्ल्याच्या पुर्वेकडील भागात शाबूत असलेली तटबंदी व हत्ती तलाव तर पश्चिमेला अनेक बुरुज, दोन मुख्य प्रवेशद्वार, गवळी वाडा, सप्ततलाव, क्षतिग्रस्त पुरातण मंदिर, धबधबा, राणी काजल समाधी व उत्तरेला फतर्या मारोती आहे

No comments