एरंडोल भिमनगर येथे महामानवाला अभिवादन. प्रा.सुधीर महाले एरंडोल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) - समाज संघटित असल्यास कोणाचीही भीती नसते असे ...
एरंडोल भिमनगर येथे महामानवाला अभिवादन.
प्रा.सुधीर महाले एरंडोल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)-
समाज संघटित असल्यास कोणाचीही भीती नसते असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष व धरणगाव बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड यांनी एरंडोल येथील केवडी पुरा भागातील भिमनगर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आयोजित अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना केले.यावेळी भरत शिरसाठ,प्रा.नरेंद्र गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी भरत शिरसाठ यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मेहतर समाजा साठी ४६ सभा घेत त्या समाजासाठी सर्वात मोठा संघर्ष केला असल्याचे सांगितले.बुधा बिऱ्हाडे यांनी संविधानाचे महत्व सांगत ते घराघरात पोचवावे असे सांगितले.उपस्थितांचे आभार सागर बोरसे यांनी मानले व शेवटी बुध्दवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. याप्रसंगी प्रा.नरेंद्र गायकवाड, डॉ.अतुल सोनवणे, प्रा.उमेश सुर्यवंशी, मोहन सैदाणे, संघरत्न गायकवाड,रविंद्र बोरसे, नितिन बोरसे, अनिल बोडरे, प्रशांत इंगळे, प्रकाश शिंदे, विनोद सरदार, अमोल बोरसे, सुमित बोरसे, मयुर अहीरे, रोहीत गायकवाड, जितेंद्र बोडरे समाज बांधव व महिला उपस्थित होत्या.

No comments