महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवलेल्या चोपडा बस स्थानकावरती वाढले चोरीचे प्रमाण सीसीटीव्ही कॅमेरे व पोलीस फक्त नावालाच ? मच्छिंद्र रायसिंग ग...
महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवलेल्या चोपडा बस स्थानकावरती वाढले चोरीचे प्रमाण
सीसीटीव्ही कॅमेरे व पोलीस फक्त नावालाच ?
मच्छिंद्र रायसिंग गलंगी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा बस स्थानकाचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आला असून सुद्धा पण चोरीचे प्रकार थांबलेले दिसून येत नाही. चोपडा बस स्थानकावरती सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पण फक्त शोपीस साठी की काय? व काही पोलीस कर्मचारी यांची सुद्धा नेमणूक केले असून सुद्धा नजरेसमोर दिसतच नाहीत.
म्हणून तर चोरीचे प्रमाण वाढले तर नाही ना? असा सामान्य जनतेतून सुर निघताना दिसून येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 1/12/2025 रोजी श्यामकांत प्रल्हाद बाविस्कर राहणार गलंगी ता.चोपडा हे चोपडा बस स्थानकावरती घरी येण्यासाठी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास उभे होते. काही वेळाने चोपडा - गणपूर बस लागल्यामुळे ते गाडीत (बस) बसण्यासाठी जात असताना अज्ञात इसमाने त्यांच्या खिशात असलेले 50 हजार रुपये काढून पसार झाला. असून त्या गोष्टीला आज रोजी 17 ते 18 दिवस उलटूनही कारवाई मात्र शून्य असल्याचे बोलले जात आहे. बसस्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरे व पोलीस बंदोबस्त फक्त नावालाच का असा प्रश्न सामान्य जनतेस उपस्थित व त्यांना दिसून येत आहे. आताच्या परिस्थितीत महिला व जेष्ठ नागरिक यांच्या प्रवासाच्या भाड्यामध्ये शासनाने सवलत दिल्यामुळे प्रायव्हेट वाहन बंदच असल्यामुळे शाळेचे मुलं-मुली महिला मंडळ व जेष्ठ नागरिक यांची चोपडा बस स्थानकावर ती दिवसभर गर्दी असल्यामुळे गर्दीच्या फायदा घेऊन अज्ञात चोरटे संधीच्या फायदा घेताना दिसून येत आहेत.
प्रतिक्रिया
चोपडा पोलीस स्टेशन येथे दोन ते तीन वेळा पत्र दिले गेले आहेत. व आपल्या चोपडा बस स्थानकावर ती अजून कॅमेरे बसवले जाणार आहेत. आम्ही कायम पोलीस हवेत अशी मागणी सुद्धा केली आहे.
प्रमोद पाटील आगारप्रमुख चोपडा
No comments