यावल नगरपरिषदेत नवा इतिहास –भाजपा चे नंदाताई महाजन गटनेतेपदी भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल | भारतीय जनता पार...
यावल नगरपरिषदेत नवा इतिहास –भाजपा चे नंदाताई महाजन गटनेतेपदी
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल | भारतीय जनता पार्टीच्या यावल नगरपरिषद गटनेतेपदी सौ. नंदाताई राजेंद्र महाजन यांची सर्वानुमते निवड होताच यावलच्या राजकारणात नवीन रंग चढू लागला आहे. महिलावर्गात “डॅशिंग वुमन लीडर” म्हणून नंदाताईंचं नाव सध्या जोरदार गाजत आहे. नंदाताई महाजन या महिला नेतृत्वाच्या दृष्टीने यावलच्या इतिहासात एक महत्त्वाचं पान लिहत आहेत. साध्या कार्यकर्त्यांपासून समाजकार्यातून पुढे येत त्यांनी गटनेत्या पदापर्यंतचा प्रवास केला आहे. त्यांची कार्यशैली, ठाम भूमिका, लोकांशी संपर्क आणि निर्णयक्षमता यामुळे त्या महिलांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरत आहेत.
आता आमदार अमोल जावळे आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांचा ठाम पाठिंबा मिळाल्याने यावल नगरपरिषदेत विकासाचे नवे अध्याय सुरू होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नेतृत्वात यावल शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील का, विकासाचा नवा वेग येईल का, याविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता असून सगळ्यांचे डोळे आता नंदाताईंच्या नेतृत्वाकडे खिळले आहेत.
यावल शहरात महिला नेतृत्वाला मिळालेला हा सन्मान केवळ पदापुरता नसून, नव्या दमाच्या राजकारणाची सुरुवात असल्याची भावना व्यक्त होत आहे. आता नंदाताई महाजन आपल्या धडाडीच्या कामातून विरोधकांना कसा “दुमकूळ” घालतात, हे पाहणे खरोखरच उत्सुकतेचं ठरणार आहे.

No comments