adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी लोकाभिमुख कामे करून मिळालेल्या संधीचे सोने करावे - माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे

  नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी लोकाभिमुख कामे करून मिळालेल्या संधीचे सोने करावे - माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे  शौकतभाई शेख / श्...

 नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी लोकाभिमुख कामे करून मिळालेल्या संधीचे सोने करावे - माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे 


शौकतभाई शेख / श्रीरामपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

श्रीरामपूर नगरपालिकेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये विजयश्री मिळवलेल्या नूतन लोकनियुक्त नगराध्यक्ष व नूतन नगरसेवक यांनी लोकभिमुख कामे करून आपल्याला मिळालेल्या संधीचे सोनं करावं असे प्रतिपादन तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांचा कौटुंबिक सत्कार कार्यक्रम प्रसंगी केले. 

याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या की जनतेने आपल्यावर विश्वास टाकल्याने आपल्याला यश मिळाले असून आपली जनतेप्रती जबाबदारी वाढली असून प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या संधीचं सोने करावं व निस्वार्थ भावनेणे जनतेची सेवा करावी असेही त्या म्हणाल्या.

काँग्रेसचे जिल्हा कार्यकारणी सदस्य ज्ञानेश्वर मुरकुटे आणि माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी काँग्रेसच्या नगरपालिकेत विजयी नगरसेवक तसेच निवडणुकीत उभे असलेल्या सर्व उमेदवारांचा सत्कार आयोजित केला होता. 'पुण्यभानू' या त्यांच्या इंदिरानगर येथील निवासस्थानी आयोजित सत्कार समारंभात आमदार हेमंत ओगले, नूतन लोकनियुक्त नगराध्यक्ष करण ससाणे, दिपाली ससाणे, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, माजी उपनगराध्यक्ष अंजुम शेख, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डावकर, पंडितराव बोमले, प्रमोद भोसले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.


                    याप्रसंगी आ. ओगले म्हणाले की नगरपालिका ही नागरिकांना सेवा पुरवण्यासाठी असते. नगरसेवकांचे फोन २४ तास सुरू असले पाहिजे. ते नॉट रिचेबल असता कामा नये. नागरिकांचे म्हणणे ऐकून घ्या, त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.

निधीची काळजी करू नका, निधी आणणे आमचे काम आहे ते माझ्यावर सोडा, निधी कमी पडणार नाही याची ग्वाही देतो व 

नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली लोकाभिमुख काम उभे राहिल असा विश्वास आमदार हेमंत ओगले यांनी व्यक्त केला. 

तर माजी आ. जयंतराव ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या काँग्रेसच्या सर्व शिलेदारांनी मिळून गेल्या वेळची चूक दुरुस्त केली आणि एका क्रूर प्रशासनाचा अस्त केल्याची भावना नगरपालिकेतील काँग्रेसचे नवनियुक्त गटनेते मुजफ्फर शेख यांनी व्यक्त केली.

नगराध्यक्ष करण ससाणे यांनी सर्वांना सोबत घेऊन लोकाभिमुख व विकासात्मक कामे करण्याचे आश्वासन दिले.

 दिपाली ससाणे यांनी या कौटुंबिक कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या. सचिन गुजर यांनी प्रारंभी निवडणूक काळातील घडामोडी विषय सांगताना

 ज्ञानेश्वर मुरकुटे व डॉ. वंदना मुरकुटे यांनी प्रामाणिकपणाने व निष्ठेने काँग्रेस पक्षाचा जोरदार प्रचार केला, असा उल्लेख करून आमदार हेमंत ओगले व नगराध्यक्ष करण ससाणे त्यांच्या कार्याचे कौतुक केले. शहरातील निवडणूक झाली, आता ग्रामीण भागातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही सर्वांनी पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचे आवाहन यावेळी ससाणे यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर यांनी निवडणूक घडामोडींबद्दल सविस्तर माहिती दिली. विरोधकांनी काँग्रेसचा प्रचार दडपण्यासाठी केलेल्या कटकारस्थानांची माहिती देताना त्यांनी स्वतःवर बेतलेल्या संकटाबद्दलही माहिती दिली.

माजी उपनगराध्यक्ष अंजुम शेख यांनी लोकाभिमुख व नागरिकांना मदत होईल असे काम करण्याचे आवाहन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना केले. 

मुजफ्फर शेख यांनी बोलताना गेल्या पाच-सात वर्षात नगरपालिकेतील पदाधिकारी जनतेची आणि नगरसेवकांशी देखील क्रूरतेने वागल्याची खंत व्यक्त केली. माजी आमदार जयंत ससाणे यांच्या माध्यमातून मित्र मंडळ पालिकेत काम करत होते. नागरिकांना मदत होईल असेच काम होत होते. मात्र अनुराधा आदिक यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात एकही समिती नेमली गेली नाही. उपनगराध्यक्षालाही साधी खुर्ची दिली नाही. नागरिकांची कामे वेळेत झाली नाही. आता तसे होता कामा नये तसेच स्वर्गीय ससाणे यांच्या शिकवणी प्रमाणे सामान्य नागरिकाला मदत होईल असेच काम केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 प्रारंभी ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी सर्वांचे स्वागत केले. डॉ. वंदना मुरकुटे यांनी प्ररास्ताविक व सूत्रसंचालन केले.

----------------------------------------------------

काँग्रेस पक्षाचे काम अत्यंत विश्वासू व निष्ठेने करणाऱ्या ज्ञानेश्वर (माऊली) मुरकुटे व डॉ. वंदनाताई मुरकुटे या दांपत्याच्या पाठीशी भावी काळामध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते खंबीरपणे व ताकतीनिशी उभे राहतील व त्यांचे मोलाचे योगदान संघटना विसरणार नाही.

करण ससाणे

 नूतन लोकनियुक्त नगराध्यक्ष श्रीरामपूर

--------------------------------------------------

No comments