adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सोलापूरात भीषण अपघात एका विद्यार्थिनीचा मृत्यू तर दुसरी विद्यार्थिनी गंभीर जखमी, मोहोळ पोलीस ठाण्यात चालकांवर गुन्हा दाखल !

 सोलापूरात भीषण अपघात एका विद्यार्थिनीचा मृत्यू तर दुसरी विद्यार्थिनी गंभीर जखमी, मोहोळ पोलीस ठाण्यात चालकांवर गुन्हा दाखल !   संभाजी पुरीगो...

 सोलापूरात भीषण अपघात एका विद्यार्थिनीचा मृत्यू तर दुसरी विद्यार्थिनी गंभीर जखमी, मोहोळ पोलीस ठाण्यात चालकांवर गुन्हा दाखल ! 


 संभाजी पुरीगोसावी (सोलापूर जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 सोलापूर मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आज सकाळी कॉलेजला निघालेल्या दोन विद्यार्थिनीच्या दुचाकीला भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने जोरदार धडक दिली. या दुर्दैवी भीषण अपघातात एका 17 वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रज्ञा धनाची कोकाटे (वय 17) असे या मृत विद्यार्थिनींचे नाव आहे. तर स्नेहल काशिनाथ वाघमोडे (वय 17) जखमी विद्यार्थिनीचे नाव आहे. प्रज्ञा कोकाटे ही इयत्ता 11वी च्या वर्गात सायन्स मध्ये शिक्षण घेत होती. तर स्नेहल वाघमोडे ही कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात 11वीच्या या वर्गात शिक्षण घेत होती. या दोघींच्या दुचाकीवरून या दोघी दुचाकीवरून कॉलेजला निघाल्या होत्या. पिंपरी परिसरांत अचानक समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली या भीषण अपघातात प्रज्ञा कोकाटे हिचा जागीच मृत्यू झाला. तर स्नेहल काशिनाथ वाघमोडे ही जखमी झाली आहे.  प्रज्ञा कोकाटे हिच्या अचानक दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले अपघातग्रस्त टेम्पो आणि चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments