adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जयसिंगपुरात पेपर विक्रेत्या व्यापाऱ्याला लुटणाऱ्या पाच जणांना ठोकल्या बेड्या !

 जयसिंगपुरात पेपर विक्रेत्या व्यापाऱ्याला लुटणाऱ्या पाच जणांना ठोकल्या बेड्या ! 34,55 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, कराड तालुका पोलिसांची दमदार ...

 जयसिंगपुरात पेपर विक्रेत्या व्यापाऱ्याला लुटणाऱ्या पाच जणांना ठोकल्या बेड्या ! 34,55 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, कराड तालुका पोलिसांची दमदार कामगिरी 


 संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 कराड तालुका पोलीस ठाणेच्या हद्दीमधील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नांदलापूर (ता. कराड) गावच्या हद्दीत येथील एका पेपर विक्रेता व्यावसायिक व्यापाऱ्याला लाकडी दांडके व चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या पाच आरोपींना अखेर कराड तालुका पोलिस आणि डीवायएसपी यांच्या पथकांने आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपींकडून एक पिस्तूल चाकू व लुटलेला सुमारे 35 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांना कराड येथील न्यायालयात हजर केले असता शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. शुभम महेश कदम (वय 29) रा. मलकापूर ता. कराड) श्रीहरी धनाजी साळुंखे ( वय 25) रा. बैल बाजार रोड मलकापूर ता. कराड) विकास मोहिते (वय 28 )रा. रेठरे बुद्रुक तालुका कराड) राहुल दीपक खंडग (वय 26) रा. उंब्रज ता. कराड) आणि कारचालक नवनाथ बाळासाहेब चोरमुले (वय 31) रा. जयसिंगपूर ता. जि. कोल्हापूर) अशी पोलीस कोठडी मिळालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून एक पिस्तूल चाकू रोख  रक्कम सोन्याची चैन आणि गुन्ह्यात वापरलेली चार चाकी गाडी असा सुमारे 34 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पेपर व्यवसायिक निकेत बियाणी यांनी दिनांक 18 डिसेंबर रोजी कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.नि. गणेश बिराजदार यांच्यासह कराड तालुका पोलीस ठाणे आणि डीवाय एसपी यांच्या पथकांतील आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.

No comments